शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचं आरक्षण दिलं; भिमराव परघरमोल (लेखक,व्याख्याता), २६ जुलै, आरक्षण दिनानिमित्त अकोला येथे ग्रंथार्पणाचे आयोजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे
अकोला दि.२७ ; शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचं आरक्षण दिलं; भिमराव परघरमोल. मनुस्मृतीनुसार वर्ण व्यवस्थेतील ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांनाच फक्त आरक्षण होतं तर शूद्रांना त्यामध्ये कुठेही स्थान नव्हतं. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला म्हणजेच शुद्रांना आरक्षण देऊन सामाजिक न्यायाची सुरुवात केली. असे प्रतिपादन भिमराव परघरमोल (लेखक तथा व्याख्याता फुले ,शाहू ,आंबेडकरी विचारधारा तेल्हारा) यांनी केले.
सविस्तर वृत्त असे की, बुद्ध विहार जठार पेठ, अकोला येथे वर्षावासाच्या कालावधीमध्ये ग्रंथपणाचा कार्यक्रम सुरू असून २६ जुलै रोजी आरक्षण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचकावर प्रमुख पाहुणे म्हणून भिमराव परघरमोल, एड. नानासाहेब तायडे, प्रदीप मेश्राम ,सुमनताई तिरपुडे यांची उपस्थिती होती.
कार्यमक्रमाच्या आरंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून दहावी- बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व हेमंत तिरपुड़े यांचे सम्राट अशोक ही दोन पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संविधान समजून घेतांना भिमराव परघरमोल आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की सामाजिक न्यायाच्या आरक्षणाची संकल्पना ही महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडून, राजर्षी शाहू महाराजांनी त्याला मूर्तरूप दिले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाला संविधानिक कवच कुंडल प्रदान केली. असे ते म्हणाले. त्यानंतर प्रदीप मेश्राम यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन झाले. या प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता शिरसाठ यांनी करून संचालन व प्रास्ताविक तथा आभार प्रदर्शन सुमनताई तिरपुडे यांनी केले.
कार्यक्रमाला आंबेडकर नगर, जठार पेठ तसेच अकोल्यातील अनेक महिला पुरुषांची उपस्थिती होती.✍️



