लोळेगाव मधील विविध विकास कामे मंजुरीसाठी खासदार लंके यांना निवेदन

सामनगाव – ऋषिकेश काळे
शेवगाव तालुक्यातील लोळेगाव येथील विविध विकास कामे मंजुरीसाठी खासदार निलेश लंके यांना आज लोकनियुक्त सरपंच भानुदास काळे यांनी तहसील कार्यालय येथे शेवगाव तालुका आढावा बैठकीसाठी आलेले खासदार निलेश यांना भेटून निवेदन देण्यात आले.
यामध्ये लोळेगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे नवीन गेट मिळावे, लोळेगाव ते सामनगाव 2 किमी अंतर असलेला रस्ता खासदार निधीतून मंजूर करावा. लोळेगाव ते जोहारापुर रस्ता मंजूर करावा,केदार वस्ती, पठाडे वस्ती नवघरे वस्ती येथे अक्षय प्रकाश योजना अंतर्गत नवीन डीपी बसवणे. लोळेगाव ते भातकुडगाव रस्ता मंजूर करावा
अशा प्रकारे लोळेगाव येथील विविध विकासकामे मंजूर करावे असे निवेदन देण्यात आले.आपण दिलेले निवेदन आम्ही शंभर टक्के मार्गी लावू असे आश्वासन खासदार निलेश लंके लंके यानी दिले.
चौकट
लोळेगाव तेथील कोल्हापूर पद्धतीचा मोठा बंधारा आहे परंतु अपुऱ्या गेट अभावी बंधाऱ्याची गळती मोठया प्रमाणात होत असुन पाणी शिल्लक राहत नाही त्यामूळे खासदार यांनी तातडीने निविन गेट साठी निधी मंजूर करावा.
भानुदास काळे
(लोकनियुक्त सरपंच लोळेगाव



