महाराष्ट्र

संजीवनी मत्स्य संघाचे माध्यमांतुन शेतक-यांना शेतीपुरक व्यवसायातुन शाश्वत उत्पन्न मिळावे यासाठी वर्षभरात सत्तर लाख मत्स्यबीज निर्माती करणार…..विवेक कोल्हे

कोपरगाव: किसन पवार

         शेतक-यांना शाश्वत उत्पन्न मिळावे यासाठी शेततळयातील मस्त्य शेती संवर्धनाचे संपुर्ण मार्गदर्शन एकाच छताखाली मिळावे या उद्देशाने संजीवनी फोरम व संजीवनी मत्स्य संघाचे माध्यमातुन वर्षभरात सत्तर लाख मत्स्यबीज निर्मीती करणार असल्याचे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले. 
       तालुक्यातील संवत्सर येथील शेतकरी प्रकाश बारहाते यांच्या शेततळयात संजीवनी फोरमच्या सहकार्याने ११ महिन्यापुर्वी सोडण्यांत आलेल्या बीज संवर्धनातुन तयार झालेल्या मासे उत्पन्नाची विक्रीचा शुभारंभ करण्यांत आला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
        विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, शेती व्यवसायावर दिवसेंदिवस नैसर्गीक, आसमानी तसेच सुलतानी संकटे येत आहेत त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणांत नुकसान होत आहे, शेतक-यांना शेतीपुरक व्यवसायातुन शाश्वत उत्पन्न मिळावे यासाठी संजीवनी फोरमची स्थापना करण्यांत आली असुन जिल्हयात सर्वप्रथम संजीवनी मत्स्य संघाची नोंदणी करून त्यातुन मत्स्य शेती संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. गेल्या ११ महिन्यात कोपरगांव विधानसभा मतदार संघात ६० शेततळयात मत्स्य शेती उपक्रम हाती घेवुन त्याबाबतचे शास्त्रोक्त मार्गदर्शन एकाच छताखाली देवुन त्यातुन उत्पादीत होणा-या माशांची खरेदी-विक्री या संघाच्या माध्यमांतुन केली जाणार आहे तेंव्हा जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले.
         याप्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अमृता पवार, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, सर्व संचालक मंडळ, संजीव पवार ,सुश्रुत फाउंडेशन नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरसाठ, महाराष्ट्र बँकचे व्यवस्थापक हितेश कुशारे यांच्यासह पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विष्णुपंत क्षीरसागर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

शेवटी पांडुरंगशास्त्री शिंदे यांनी आभार मानले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button