जळगावा जिल्हाबुलढाणामलकापूरमहाराष्ट्रविदर्भसंपादकीय

लिमरा प्रिंटिंग प्रेसबाबत अफवांना पूर्णविराम; अधिकृत कार्यालयाशीच संपर्क साधण्याचे आवाहन

मलकापूर | प्रतिनिधी

अलीकडील काही दिवसांपासून लिमरा प्रिंटिंग प्रेस संदर्भात विविध प्रकारच्या चर्चा आणि अपुष्ट माहिती प्रसारित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रेसचे मालक जफर खान अतहर खान यांनी अधिकृत निवेदन जारी करून सर्व गैरसमजांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच नागरिकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी संबंधितांनी केवळ अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.प्रेस व्यवस्थापनाने स्पष्ट केले की, लिमरा प्रिंटिंग प्रेस नियमितपणे कार्यरत असून त्याचा अधिकृत पत्ता – ईदगाह प्लॉट, पारपेट, मलकापूर हा आहे. तसेच कोणतीही माहिती, सेवा किंवा RNI नोंदणीसंदर्भातील प्रक्रिया, संमती अथवा मार्गदर्शनासाठी थेट अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे. यासाठी मोबाईल क्रमांक 9881850730 उपलब्ध करण्यात आला आहे.प्रेसचे मालक जफर खान अतहर खान यांनी सांगितले की, सोशल मीडियावर अथवा इतर माध्यमांतून अपूर्ण किंवा अपुष्ट माहिती प्रसारित केल्यास नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही माहिती सत्य असल्याची खात्री न करता ती पुढे पाठविणे किंवा प्रसारित करणे टाळावे. अशा प्रकारच्या अफवा सामाजिक सलोखा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही घातक ठरू शकतात, असे त्यांनी नमूद केले.याच अनुषंगाने, वृत्तपत्र संपादक, प्रकाशक, RNI नोंदणीसाठी इच्छुक अर्जदार तसेच सर्व संबंधितांनी कोणत्याही शंका अथवा माहितीसाठी थेट अधिकृत कार्यालयाला भेट द्यावी किंवा अधिकृत संपर्क क्रमांकावर संवाद साधावा, असे आवाहन प्रेस व्यवस्थापनाने केले आहे. अधिकृत माहितीवर विश्वास ठेवून अफवांना बळी न पडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button