क्राईमबुलढाणामहाराष्ट्र

लग्नास नकार दिल्याने प्रियसीची चाकूने हत्या करून प्रियकराची आत्महत्या.

लग्नास नकार दिल्याने प्रियसीची चाकूने हत्या करून प्रियकराची आत्महत्या.

जी डी रोकडे खामगाव प्रतिनिधी खामगाव, मेकर तालुक्यातील साखर खर्डा येथील प्रेमी युगोलाच्या प्रेमप्रकरणाच खामगावयेथे अंत झाला .असून लग्नास नकार देणाऱ्या पंचवीस वर्षे घटस्फोटीत प्रियसीचा चाकूने भोसकून खून करून प्रियकरारणे स्वतःही चाकू ने वार करून आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना खामगाव शहरानजीक बुलढाणा मार्गावरील जुगनू हॉटेलवर उघडीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साखरखेडा येथील सोनू उर्फ साहिल दीपक सिंग राजपूत आणि पायल समाधान पवार या दोघांचे मागील दोन वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होते. साहिल हा पायल नेहमीच लग्नासाठी गळ घालत होता दरम्यान दोघेही 23 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता दरम्यान खामगाव शहराला लगत असलेल्या बुलढाणा मार्गावरील हॉटेलजुगणू येथील गेस्ट हाऊस वर थांबले होते यादरम्यान या दोघांमध्ये पुन्हा लग्नावरून वाद उफाळून आला होता.या वादातून साहिल याने पायल ला धारदार चाकूने भोसकून तिची हत्या केली. त्यानंतर स्वतःवर सुद्धा चाकूने घाव घालून आत्महत्या केली .सदर घटना काही वेळातच हॉटेल चालकाच्या लक्षात आले त्यांनी तातडीने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला माहिती दिली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व हॉटेलमध्ये पाहणी केली असतात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात मृता अवस्थेत आढळून आले या घटनेची माहिती मिळतात जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले व घटनेची चौकशी केली यावेळी पोलीस विभागाकडून फॉरेन्सिक लॅबच्या तज्ञांना सुद्धा पाचरन करण्यात आले होते .पोलिसांनी दोघांचे मृत्यूदेह सामन्या रुग्णाला येते पाठवले असून पोलिसांची कारवाई सुरू होती ..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button