अकोला

रेल्वे रस्त्याच्या भरावासाठी शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याची ऐशितैशी.

रेल्वे रस्त्याच्या भरावासाठी शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याची ऐशितैशी.

हिवरखेड (वार्ताहर )आकोट

खंडवा रेल्वे लाईनसाठी आकोट -अडगाव-हिवरखेड या रेल्वे रस्त्याचे काम झपाट्याने सुरु आहे पण रेल्वेच्या या रस्त्यासाठी मात्र शेतरस्त्यांची ऐशितैसी झाली असून शेतातून पिक घरी किंवा बाजारात कसे आणावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या रेल्वे रस्त्याच्या कामासाठी दानापूरच्या वान नदीतून हिवरखेडच्या बगाडा नाल्यावरून फार मोठया प्रमाणात गौण खनिजाची वाहतूक करण्यात आली. दररोज शेकडो ट्रक गौण खनिजाची वाहतूक सुरु होती. ही वाहतूक सुलभ करण्यासाठी रेल्वेच्या संबंधित यंत्रणेने बगाडा नाला माती टाकून पूर्ण बुजवला व त्यावरून वाहतूक केली. पावसाळ्याच्या पूर्वी अनेक शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून पावसाळ्या पूर्वी रस्ता पूर्ववत करून देण्याची विनंती केली. पण संबंधित अधिकाऱ्यांनी आम्ही तुमचा रस्ता पूर्वीपेक्षाही अधिक चांगला बनवून देऊ असे सांगत शेतकऱ्यांना झुलवत ठेवले. शेवटी पावसाळा सुरु झाल्यावर रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी थातूरमातुर रस्ता तयार करून दिला आणि पावसाच्या पहिल्याच पाण्यात त्या मातीच्या पुलाच्या दोन्ही बाजूनी कमरेच्या वर पाणी साचून मोठमोठाले खड्डे पडले. आता या अशा रस्त्यावरून माल वाहतूक कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर बोलले असता ते टोलवाटोलवीची उत्तरे देतात. तरी शेतकऱ्यांचा हा शेतरस्ता ताबडतोब तयार करून देण्यात यावा अशी मागणी सागर वानखडे, अमोल अढाऊ, स्वप्निल राऊत, अजिज खान, विठ्ठल कसुरकार, रोहित वानखडे, सुरेश डोले, महेंद्र कराळे, यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button