अकोलाबुलढाणामहाराष्ट्रवनविभागविदर्भ

अकोला वनविभागात दि.२ ऑक्टोबरला सुरू होणार ‘वन्यजीव सप्ताह – २०२६’ !

दि. ८ ऑक्टोंबर ला बक्षीस वितरणाने होणार समारोप!

नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे वनविभागाचे आवाहन!

विजय मनोहरराव घोडे आवाज न्यायाचा प्रतिनिधी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

दि.२५ सप्टें.२६| अकोला वनविभागातर्फे दि. २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘वन्यजीव सप्ताह २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. उपवनसंरक्षक (प्रादेशिक) सुमंत एस. सोळंके यांनी या सप्ताहाच्या नियोजनाचे अधिकृत पत्रक जाहीर केले आहे. वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण जागरूकतेसाठी ७ दिवस विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सप्ताहाचे सविस्तर वेळापत्रक आणि प्रमुख कार्यक्रम:

  • दि. २ ऑक्टोबर (शुक्रवार): डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कॅम्पस येथे सकाळी ६:३० वाजता पक्षी निरीक्षण आणि ‘बायोडायव्हर्सिटी वॉक’ने सप्ताहाची सुरुवात होईल. तसेच उपवनसंरक्षक कार्यालयापासून ‘वन्यजीव संरक्षण व संवर्धन सायकल रॅली’ काढण्यात येईल आणि डॉ. हेडगेवार रक्तपेढी येथे रक्तदान सप्ताहाचे उद्घाटन केले जाईल.
  • दि.३ ऑक्टोबर (शनिवार): काटेपूर्णा आणि नरनाळा अभयारण्यात ‘निसर्ग अभ्यास सहल’ (Nature Trail) आयोजित करण्यात आली आहे. यासोबतच जिल्हा परिषद शाळा शहानुर येथे विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा घेतली जाईल.
    दि. ४ ऑक्टोबर (रविवार): वनविद्या महाविद्यालय येथे ‘पोस्टर मेकिंग, चित्रकला व काव्य स्पर्धा’ आणि ‘ट्रेझर हंट’ चे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय ‘Connecting Habitats Thriving Wildlife’ या विषयावर टॉक शो आणि माळराजुरा (पातूर) येथे निसर्ग सहल आयोजित केली आहे.
    दि.५ ऑक्टोबर (सोमवार): वनविभागाच्या कार्यालयात ‘तणावमुक्ती आणि औषधमुक्त जीवन’ यावर सेमिनार होईल. खंडेलवाल महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा आणि कृषी विद्यापीठात ‘वाइल्डलाईफ युथ पार्लमेंट’ पार पडेल.
  • दि.६ ऑक्टोबर (मंगळवार): विभागीय वनअधिकारी यशवंत नागुलवार आणि अकोटचे उपवनसंरक्षक सुमित कुमार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ‘वन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आर.एल.टी. सायन्स कॉलेजमध्ये ‘सर्पदंश जागरूकता आणि प्रथमोपचार कार्यशाळा’ घेतली जाईल.
  • दि. ७ ऑक्टोबर (बुधवार): जसनागरा पब्लिक स्कूल (रिधोरा) आणि श्री शिवाजी महाविद्यालय (अकोट) येथे ‘वन की बात’ आणि पोस्टर प्रदर्शन भरवले जाईल.
  • दि.८ ऑक्टोबर (गुरुवार): पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे ‘मानव-वन्यजीव संघर्ष’ (HWC) या विषयावर महत्त्वपूर्ण कार्यशाळा होईल. दुपारी ३ ते ५ या वेळेत भव्य ‘बक्षीस वितरण समारंभाने’ या सप्ताहाचा समारोप केला जाईल.

हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी विविध महाविद्यालयीन विद्यार्थी, मानद वन्यजीव रक्षक आणि निसर्गप्रेमी संस्थांचे सहकार्य लाभणार आहे. नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button