मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरस्वच्छता व प्लॅस्टिक निर्मूलन बाबत जनजागृती रॅली!

आवाज न्यायाचा प्रतिनिधी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
मूर्तिजापूर /अकोला : विजय मनोहरराव घोडे
स्थानिक रेल्वे स्थानकावर
नुकतेच स्वच्छता अभियान या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तसेच येथील प्रवाशांच्या सहभागातून स्वच्छता व प्लॅस्टिक निर्मूलन बाबत जनजागृती पर रॅली आणि प्रवाशांचे प्रबोधन करण्यात आले. रॅलीमध्ये रेल्वे विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने प्रवाशांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यामध्ये स्टेशन प्रबंधक तसेच गिरी, कुलकर्णी व इतर कर्मचारी आणि येथील स्वच्छता अभियानाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य सत्यनारायण तिवारी, सुनील भोजगडिया, सोहन सरवरे, जितेंद्र चौबे, रोहित सोळंके, इमरान, सुनील वानखेडे , विलास नसले, दिनेश श्रीवास, विलास वानखडे, रवी चव्हाण आदी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.



