वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने खामगाव येथील बौद्ध समाजाच्या मुलाला गंभीर जखमी केल्याच्या निषेधार्थ आठ दिवसाचा प्रशासनाला इशारा.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस संग्रामपुर तालुका प्रतिनिधी रतन भगत.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने खामगाव येथील बौद्ध समाजाच्या मुलाला गंभीर जखमी केल्याच्या निषेधार्थ आठ दिवसाचा प्रशासनाला इशारा.
संग्रामपूर – सविस्तर वृत्त असे की रोहन पैठणकर हा एक खामगाव येथील बौद्ध समाजाचा गरीब घराण्यातील मुलगा नेहमीप्रमाणे आपल्या कामावर जात असताना त्याला तेथीलच रोहित पगारिया , गब्बू गुजरीयाल, व प्रशांत संगेले या तीन नराधमांनी अडवलं व तू गाय चोर आहेस असे म्हणत बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर हे नराधम थांबले नाहीत तर तुझी जात काय तुझा धर्म कोणता असे म्हणत रोहनला नग्न करत त्याचे लिंग पाहून बेदम मारहाण केली त्याचा डोळा देखील जखमी केला .रोहन वारंवार विनवणी करीत होता मी बौद्ध आहे आणि मी निर्दोष आहे. असे सांगत होता परंतु त्या नराधमांनी त्याचे न ऐकता त्याला जातीय वाचक शिवीगाळ केली आणि त्याला जखमी केले. याघटनेच्या निषेधार्थ वंचित युवा बहुजन आघाडी संग्रामपूर तालुक्याच्या वतीने निषेध करून रोहनला मारहाण करणाऱ्या तिघांना ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत मोका लावा तसेच या प्रकरणात आरोपीला खुले सोडणाऱ्या खामगावच्या पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा .अन्यथा आठ दिवसानंतर शासनाच्या विरोधात प्रचंड निषेध मोर्चा काढून असा निवेदनात इशारा देण्यात आला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आशिष धुंदळे वसूलकर काका, रत्नाकर भिलंगे ,निलेश लहासे, नईम कुरेशी ,राहुल बिलंगे किशोर भिडे, प्रकाश वानखडे ,नामदेव कोकाटे ,उमेश भिलंगे ,यशवंत वानखडे, सिद्धार्थ बोधडे ,गणेश वानखडे, यशवंत वानखडे, नंदकिशोर पुंडे, संदेश वाकोडे ,कपिल बोदडे, उज्वलाताई वाघ ,कल्पनाताई धुंधळे ,ससाने संतोष इंगळे, नागेश वाकोडे ,दीपक पहुरकर ,अजय सरदार, श्रीकृष्ण खंडेराव ,अक्षय तायडे, राजेश तेलगोटे, निर्मला धुळे ,भारसाकडे इत्यादी सह वंचित युवा आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



