Uncategorized

“रिठद येथे बैलपोळा सण साजरा “बैलजोडी व मालकास इनाम वाटप”*

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – वर्षानूवर्षे चालत आलेली परंपरा कायम ठेवत यावर्षी सुद्धा रिठद येथे बैलपोळा साजरा करण्यात आला.रिठद येथे पोळा भरवण्याचे ठिकाणी मारोती मंदिर परिसरात हा पोळा भरवण्यात आला. यावेळी परिसरात असलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विलास बोरकर, विश्वनाथ आरू यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यानंतर बैलांचे लग्न लावण्यासाठी पाच मंगलाष्टके झाली.व नंतर बैलपोळा सण संपन्न झाला.यादरम्यान कोणत्याही शेतकऱ्यांने बैल पळवण्याची घाई करू नये यासाठी गावातील गजानन गीरी (गुरुजी) व दिपक गजानन आरु यांनी शेवटपर्यंत जी जोडी राहील त्यासाठी तिनशे,व शंभर रुपये प्रत्येकी इनाम जाहीर केले.त्याप्रमाणे गजानन गीरी यांचे कडून भिकाजी गोडघासे यांचे बैलजोडीचा तिनेशे रु चे बक्षिस गजानन गीरी सर यांचे हस्ते व नारायण आरु, तंटामुक्ती अध्यक्ष भीमराव बोरकर यांच्या बक्षीस उपस्थितीत देण्यात आले यावेळी. यावेळी शेतकरी व गावातील मंडळी उपस्थित होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button