वसंतराव देशमुख इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात संपन्नहिवरखेड (विशेष बातमीदार) :

आकांक्षा शिक्षण संस्था, हिवरखेड (रूप) द्वारे संचलित वसंतराव देशमुख इंटरनॅशनल स्कूल,आकांक्षा महाविद्यालय व वसंतराव देशमुख रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात उत्साही वातावरणात ध्वजारोहणाने करण्यात आली. ध्वजारोहण आकांक्षा शिक्षण संस्थेच्या संचालिका मा. श्रीमती मालती वसंतराव देशमुख यांच्या शुभहस्ते पार पडले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्ष तथा वसंतराव देशमुख इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापक मा. श्रीमती नलिनीताई बंडू लहाने होत्या.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी देशभक्तीच्या निनादात ‘वंदे मातरम’, राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायन करून भारतमातेला व तिरंग्याला मानाचा मुजरा केला.
या मंगलप्रसंगी विद्यार्थ्यांची एक भव्य आणि आकर्षक रॅली काढण्यात आली. ‘भारत माता की जय’ च्या जयघोषाने संपूर्ण हिवरखेड परिसर दुमदुमून गेला होता. या रॅलीमध्ये सर्व पालकवर्ग तसेच उपस्थित मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक भान जपत डॉ. आशिष कातोरे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या व आपत्कालीन सुरक्षेच्या दृष्टीने शाळेस ‘प्रथमोपचार पेटी’ भेट दिली. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व उपस्थितांनी व शाळा व्यवस्थापनाने विशेष कौतुक केले.
या सोहळ्यास व्यासपीठावर केंद्र संयोजक प्रा. वैष्णवी मयूर लहाने यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार अर्जुन खिरोडकार, डॉ. आशिष कातोरे, देविदासजी चाफे, किशोर मसुरकर, अमन कवळकर, रूपाली भुईकर, शारदा परनाटे, श्रीकांत परनाटे, अश्विनी जोशी, मारुती काटोले व सुमन पळसकार, ज्ञानेश्वर भिसे यांची विशेष उपस्थिती होती.
या प्रसंगी परिसरातील आदरणीय पालक, हितचिंतक, लोकसेवक, समाजसेवक, पत्रकार बांधव, दानशूर व्यक्तिमत्त्वे, सर्व सन्माननीय पालक प्रतिनिधी व समस्त हिवरखेड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. वैष्णवी लहाने यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. तसेच हा सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी राजनकर मॅडम आणि मुस्कान मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्यासोबतच वसंतराव देशमुख इंटरनॅशनल स्कूल व आकांक्षा महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.










p






