बुलढाणामहाराष्ट्र

भोपळे विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; गुणवंत विद्यार्थी व राज्यस्तरीय खेळाडूंचा गौरव

हिवरखेड (विशेष प्रतिनिधी) : येथील सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात १५ ऑगस्ट रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन विविध सामाजिक उपक्रम, देशभक्तीपर वातावरण आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ध्वजाला सलामी देण्यात आली. वंदे मातरम्, राष्ट्रगीत, राज्यगीत आणि भारतमातेच्या जयघोषाने संपूर्ण विद्यालय परिसर दुमदुमून गेला. अध्यक्षीय भाषणातून अनिलकुमार भोपळे यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांनी या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ज्ञानात भर पाडावी. तसेच देशाचा उत्तम नागरिक घडण्यासाठी शैक्षणिक वाटचालीतून प्रामाणिक प्रयत्न करावा, असा मौलिक संदेश दिला

या सोहळ्यास महात्मा फुले शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक सत्यदेव गिऱ्हे, उपाध्यक्ष डॉ.प्रमोद भोपळे, सुनील राऊत,कार्यवाह श्यामशील भोपळे, ज्येष्ठ संचालिका अन्नपूर्णाबाई बंड,संचालक वीरेंद्र भोपळे, प्रकाशचंद्र खोब्रागडे, शिवशंकर मार्के,पंकज राठी, संचालिका साधनाताई भोपळे, कोषाध्यक्ष कौस्तुभ भोपळे, पालक प्रतिनिधी विनोद ताळे, दानशूर व्यक्ती सत्यदेव तायडे, गणेश राठोड, लक्ष्मण हिवराळे, पत्रकार प्रतिनिधी केशव कोरडे , गजानन राठोड तसेच माजी विद्यार्थी व भारतीय सैनिक विशाल दाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मयूर लहाने यांनी ‘नशामुक्त भारत’ या अभियान अंतर्गत उपस्थितांना प्रतिज्ञा दिली. स्नेहा शुक्ला यांनी पॉश कायद्यांतर्गत महिला सुरक्षेबाबत प्रतिज्ञा दिली, तर राजेश काळे यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षेची शपथ दिली.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या आजीवन सदस्या स्व. कमलिनीताई सहदेवराव भोपळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दानशूर व्यक्तींच्या सहयोगातून राबविण्यात येणाऱ्या विशेष बक्षीस योजनेची माहिती संस्थेचे सहकार्यवाह स्नेहल भोपळे यांनी दिली. या योजनेअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

तसेच शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विविध क्रीडा प्रकारांत राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील यशाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांचे वृक्षरोप भेट देऊन साजरे करण्याचा अभिनव उपक्रमही यावेळी राबविण्यात आला. या उपक्रमातून ‘एक विद्यार्थी–एक वृक्ष’ आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शंकर दुनघव व डॉ. मयूर लहाने यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे प्राचार्य संतोषकुमार राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक गणेश खानझोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button