Uncategorized

मेडशी येथून श्री क्षेत्र डव्हा येथे द्वारका

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – गेल्या 90 वर्षापासून पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ताना पोळाच्या रोजी कर च्या मुहूर्तावर मेडशी येथील फैलातील महादेव मंदिरापासून संपूर्ण गावात प्रदक्षिणा मारत मोठ्या थाटामाटात व उत्साहात द्वारका श्री क्षेत्र डव्हा साठी रवाना झाली.दरवर्षी ही द्वारका पायदळ जात असते.या द्वारकेची सुरुवात पंढरीराव केशवराव घुगे यांचे पुत्र भास्करराव पंढरीराव घुगे व दशरथ कुंडलिक देशमुख यांनी केली होती.आज त्यांचे वंशज सतीश भास्कर घुगे व उत्तम दशरथ देशमुख यांच्यासह गावातील सर्वच मंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन संपूर्ण गावात द्वारकेची भव्य दिव्य मिरवणूक करून ब्राह्मणवाडा, सुकांडा,कुरळा मार्गे डव्हाला जाते.या वेळी गावातील महिला व पुरुषसह लहान मुलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता.द्वारकेचा मानाचा बैल हा बाबाराव देशमुख यांचा असतो.तर द्वारका ही सतिश घुगे ह्यांचा कडून असते.तसेच या वेळी द्वारका सोबत दिंडी पण होती.रस्त्याने ठीक ठिकाणी नंगेनाथ भक्ताकडून द्वारकेची भाविका कडून पूजा अर्चना व चहा नाश्ताची व्यवस्था केली जाते.या वेळी मेडशी येथील विनायक मेडशीकर,रामदास सोलनोर,डिगाबर घुगे,सुनील घुगे,दिनकर तायडे,भगवान साठे,गजानन साठे,मुकिंदा तायडे, पांडे महाराज,बबन पांडे, संतोष पांडे, विलास लोखंडे,वसंता शिंदे,बहादुरे, अनिल नवले,अजय जैन,प्रकाश सानप, मुकेश देशमुख,दत्तराव घुगे, धीरज देशमुख,केशव सोलनोर सह गावातील व परिसरातील महिला व पुरुषांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.तसेच श्री क्षेत्र डव्हा येथे संस्थानच्या द्वारका मध्ये आलेल्या सर्व भविका साठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button