जळगावा जिल्हावैद्यकीय

रा. स्व.संघ सेवा भारती मार्फत मुक्ताईनगर तालुक्यात एक हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

अर्जुन गोरले

गेल्या १० वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक सेवाभारती या सेवा विभागा मार्फत काकोडा ता मुक्ताईनगर येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिवीराचे आयोजन केल्या जाते आज दि१७/४/२०२५ रोजी शस्त्रक्रियेसाठी रवाना झालेल्येत लाभार्थी मिळून एकहजार (१०००) लाभार्थीच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या यामध्ये काकोडा,कुऱ्हा, बोद‌वड धामणगाव चारठाणा मधापुरी,हालखेडा, मोरझिरा थेरोळा, जौधनरखेडा पारंबी सुळे रिगांव कोथळी तसेच बुलदाणा जिल्हातील पळशी, दरसखेड, पिंपळगाव इ-गावातील लाभार्थ्यांनी लाभ घेतला या शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथील बाफना नेत्रपेढी व कांताई नेत्रपेढी जळगाव यांचे सहकार्य लाभले यांच्या अमोल सहकार्यामुळे हे शक्य झाले लाभार्थी खूप खुश व आनंदी झाले कांताई नेत्राच्या सहकार्याने काकोडा येथे दर महिन्याला शिबिर घेतल्या जाते त्याचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आव्हान रा. स्व संघ व सेवा भारती तर्फे प्रद्योत कुलकर्णी यांनी केले फोन नंबर ७६२०७८२२९५ त्यांनी काकोडा गाव मोतीबिंदू मुक्त करण्याचे ठरविले आहे या कामी गावकऱ्यांचे व ज्येष्ठ स्वयंसकांचे सहकार्य मिळाले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button