अपघात

रस्त्यावर उभ्या ट्रकला एसटी बसची धडक

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस मनवेल

यावल आगाराची एसटी मनवेल येथून शिरागड येथे जात असताना थोरगव्हाण येथील सबस्टेशन जवळ सिमेंटने भरलेला उभ्या ट्रकला एसटीची धडक लागल्याने एसटीच्या समोरच्या काचेचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने प्रवाशांना कुठलीही रजा झाली नाही.

थोरगव्हाण येथील विज वितरण कंपनीचा सबस्टेशन पासून तर गावापर्यंत रस्ता कॉकीटीकरण काम सुरु आहे. या कामासाठी सिमेंटच्या पिशव्या भरलेला ट्रक रस्त्याच्या एका बाजूला उभा होता. त्यावेळी यावल आगाराची एसटी एम. एच ४० वाय ५१९० शिरागड गावाकडे जात असताना सिमेंटने भरलेल्या उभ्या ट्रक जवळ असताना ड्रायव्हरने एसटी बस थांबवून हॅण्ड ब्रेक लावून खाली उतरून ट्रकच्या ड्रायव्हरला एका बाजूने ट्रक लावा असे सांगण्यासाठी खाली उतरला.

मात्र थांबलेली बसचे ब्रेक फेल झाल्याने बस ट्रकला धडकली. त्यामुळे समोरच्या बाजूचे काच फुटले मात्र जीवीत हानी टळली .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button