जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्र

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक होण्याचे उत्तरदायित्व सर्व भारतीयांचे ; प्रा डीबी तायडे

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक होण्याचे उत्तरदायित्व सर्व भारतीयांचे ; प्रा डीबी तायडे

फैजपूर प्रतिनिधी

प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संघर्षातून समृद्धीकडे नेणाऱ्या धगधगत्या विचारांचा ज्वालामुखी असून समाजात वितुष्ठ निर्माण करणाऱ्या विघातक प्रवृत्तींना आळा घालून व्यक्ती, परिवार, समाज व परिणामी देशाच्या सर्वांगीण विकासात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सदैव प्रेरणादायी होते. आहेत आणि कायमच असतील असे प्रतिपादन उपप्राचार्य तथा विभागप्रमुख रसायनशास्त्रविभाग प्रा डी बी तायडे यांनी केले.

ते फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सण व उत्सव समितीच्या वतीने आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या

महापरिनिर्वाण अभिवादन सभेत प्रमुख तेव्हाच होते वक्ते म्हणून बोलत होते.

याप्रसंगी अभिवादन सभेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी उपस्थित होते तर उपप्राचार्य डॉ अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा व्ही सी बोरोले यांच्यासहित महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची समकालीनता या विषयावर प्रा डी बी तायडे यांनी

अत्यंत अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीत बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व उपस्थितांसमोर उलगडून दाखवले.

याप्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना मा प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी कोणत्याही महापुरुषाच्या स्मृतींना अभिवादन*
जेव्हा आपण त्यांचे विचार अंगीकारतो व समाज उद्धाराच्या यज्ञात स्वतः ची आहुती देतो. डॉ बाबासाहेब आंबेडकर अखंड भारतासाठीच नव्हे तर विश्वासाठी एक ज्वलंत प्रेरणा असून भारत भूमीत असे महामानव जन्माला आले हे आपल्या साऱ्यांचेच अहोभाग्य आहे. यामुळे समाज व देशाच्या विकासात प्रत्येकाने बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक होण्याचा प्रयत्न करावा हीच खरी आदरांजली ठरेल असे आवाहन त्यांनी केले.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button