Uncategorizedखानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरवैद्यकीय

जळगाव जिल्ह्यात लंपीचा शिरकाव; पशुपालक व प्रशासन सतर्क

मुक्ताईनगर तालुक्यात लंपीचा शिरकाव; पशुपालक व प्रशासन सतर्क

जळगाव /मुक्ताईनगर. (प्रतिनिधी):


मुक्ताईनगर तालुक्यातील काही जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease) या विषाणूजन्य आजाराची लक्षणे आढळून आली असून, संशयित जनावरांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. सध्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा असली तरी, पशुपालकांनी खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शहरात व तालुक्यात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचे प्रमाण वाढले असून, अशा जनावरांमध्ये लंपीची लक्षणे दिसून येत आहेत. ही बाब अत्यंत चिंतेची असून, मोकाट जनावरांची देखभाल कोण करणार? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुक्ताईनगर नगरपंचायतीने शहरात दौंडी काढून नागरिकांना आवाहन करावे की, आपल्या जनावरांना मोकाट सोडू नये. जे नागरिक जनावरांची मालकी घेतात, त्यांनी ती जनावरे गोठ्यात ठेवावीत, अन्यथा इतर जनावरांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

ग्रामीण भागातही ग्रामपंचायतींनी पशुपालकांना योग्य मार्गदर्शन करावे. पशुसंवर्धन विभागाने यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या ५ पथकांची स्थापना केली आहे. या पथकांमार्फत गोठ्यांमध्ये फवारणी व स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत बाहेरून आणलेल्या जनावरांना तसेच नुकतीच मोठी झालेली जनावरे यांना लसीकरण करण्यात येत आहे.

विशेष बाब म्हणजे खाजगी डॉक्टरही शासकीय पथकांना सहकार्य करत असून, लंपीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सामूहिक प्रयत्न होत आहेत.

शेतकरी

लंपी या आजारांमुळे गाई मृत्यू झालेल्या आहे. तरी शासनाने याकडे लक्ष देऊन पशु उत्पादक शेतकऱ्यांना मदवीचा हात द्यावा. व ज्या गुरांना लंपी या आजाराची लागण झालेली आहेत त्या गुरांवर ताबडतोब शासनाकडून ताबडतोब उपचार करण्यात यावा अशी मागणी

पाडुरंग विश्वनाथ पाटील उपाध्यक्ष तापी पूर्णा शेतकरी गट उचंदा

संपूर्ण शहरामध्ये लसीकरण मोहीम आम्ही राबवली आहे गोठ्यात फवारणी करण्यासाठी संपूर्ण गोठेधारकांना आम्ही फवारणीसाठी पावडर स्वतः देत आहे मोकाट गुरांमध्ये लंपीचे आजार असलेल्या गुरांसंदर्भात आम्ही वेळोवेळी तोंडी पद्धतीने नगरपंचायत अधिकारी यांना सुद्धा कळवले आहे आम्ही लंपीची मोहीम राबवण्यासाठी पाच गटाची टीम तयार केलेले आहे त्यामध्ये कर्की अंतुरली हरताळे कोथळी रुईखेडा कुऱ्हा वडोदा निमखेडी मुक्ताईनगर उचंदा अशा पद्धतीने गटाची विभागणी केली आहे असे साईमत प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले

लोंढे वैद्यकीय तालुका अधिकारी मुक्ताईनगर

लपी आजाराची प्रमुख लक्षणे:

१०५ अंश फॅरनहाइट ताप
नाक, डोळे, तोंडातून पाणी येणे
डोळ्यांत व्रण, चिपडे व दृष्टी कमी होणे
तोंडातील व्रणांमुळे चारा खाण्यास त्रास
दूध उत्पादनात घट
अंगावर १०-५० मिमी व्यासाच्या कडक गाठी
गाठीवर खपल्या, खपली गळल्यावर विषाणू एक महिना जिवंत
लसीकाग्रंथी व पायावर सूज, जनावर लंगडते
त्वचेखाली सूज, प्रजनन क्षमतेवर परिणाम
गाभण जनावरांचे गर्भपात, अशक्त वासराचे जन्म
संदेश नागरिकांसाठी:
पशुपालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत. कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. नगरपंचायती व ग्रामपंचायतींनी जनजागृती व नियंत्रणासाठी आवश्यक ती पावले उचलावीत.

जिल्हाधिकारी यांची निर्देश

१) जनावरांची खरेदी विक्री साठीचे जळगाव जिल्ह्यातील कासोदा ता. एरंडोल, पारोळा, धरणगाव, रावेर या ४ गावातील गुरांचे सार्वजनिक बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात यावे.

२) जिल्ह्यातील इतर राज्यामधुन आंतरराज्य, आंतरजिल्हा व आंतरतालुका पशुधनाची होणारी वाहतुक बंद ठेवण्यात यावी. त्याकरीता जिल्हा पोलिस प्रशासन व उपप्रादेशिक परीवहन विभाग यांनी आंतरराज्य सिमेवरील चेकनाक्यावर कसुन तपासणी करावी. ज्या जनावरांना लंपी प्रतिबंधक लसीकरण करुन २८ दिवस पूर्ण झालेले आहे त्यांनी तसे प्रमाणपत्र सादर केल्यास वाहतुकीस परवानगी असेल.

३) जिल्ह्यातील वरील ७ बाधीत तालुक्यात पशुधन एकत्र येतील असे सार्वजनिक चराई व सार्वजनिक गुरांसाठीचे पाणी पिण्याचे सार्वजनिक होद पुढील १५ दिवस बंद ठेवण्यात यावे.

४) सदर रोगाचा प्रसार बाहा किटकांद्वारे (डास, माशा, गोचिड इ.) होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठ्यात बाता किटकांच्या निर्मुलनासाठी ग्रामपंचायतीने पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने औषधांची फवारणी करावी. बाधीत परिसरात गोठा स्वच्छता तसेच निर्जतुक द्रावणाची फवारणी करावी.

५) ग्रामपंचायतींनी पशुधन मृत झाल्यास त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ४ बाय ८ फुट आकाराचे खड्डे करण्याची व्यवस्था करावी. सदर व्यवस्था ग्रामपंचायत स्तरावर शक्य नसल्यास गट विकास अधिकारी यांचे मार्फत बांधकाम विभाग पंचायत समिती किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे करण्याची व्यवस्था करावी. पशुधन विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने मृत पशुधनाची विल्हेवाट लावावी.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button