मुक्ताईनगरात बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वाटप

मुक्ताईनगर । प्रतिनिधी ।
मुक्ताईनगर येथे ‘योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी’ या उपक्रमात नोंदणी केलेल्या ४३४ इमारत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचाचे (भांडी) वाटप करण्यात आले. याआधी मुक्ताईनगर शहरात कामगारांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी देखील कॅम्प लावण्यात आला होता.
नागरिकांना स्थानिक ठिकाणी लाभ घेता यावा म्हणून आ.चंद्रकांत पाटील यांनी कॅम्पचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून ही योजना राबवली जात असते. त्यातून कामगारांच्या मुलांना CIM शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच आरोग्यासाठी पाच लाखाचा विमा, मृत्यू पश्चात आर्थिक मदत,
सुरक्षा संच, गृहोपयोगी वस्तू संच असा लाभदिला जातो. गृहोपयोगी संचासाठी नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना ७ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत गृहोपयोगी संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी आ. चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील व प्रियंका पाटील यांच्या उपस्थितीत या कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले. पुढील गृहोपयोगी संचाचे वाटप साहित्य आल्यानंतर १२ मे पासून सुरळीत केले जाईल. वाटप ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये म्हणून दर
दिवशी वेळापत्रकानुसार तालुक्यातील चार गावातील लाभार्थ्यांना गृहोपयोगी साहित्य वाटप केले जाईल. प्रत्येक गावाचा दिवस ठरवून वेळापत्रकानुसार कॅम्पच्या ठिकाणी लावले जाईल. त्यानुसार मुक्ताईनगर तालुक्यातील नागरिकांनी ज्या दिवशी ज्या गावाची वाटप असेल त्याठिकाणी जाऊन या योजनेचा लाभघ्यावा. गृहोपयोगी संचासाठी स्वतः लाभार्थी उपस्थित असणे आवश्यक आहे. सोबत बांधकाम कामगार ओळखपत्र, नोंदणी केलेली ऑनलाइन पावती व आधार कार्ड हे कागदपत्रे घेऊन गृहोपयोगी संच देताना लाभार्थ्यांचा ईन फोटो काढून वितरण केले जाते.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून हे काम मिळाले असून मुक्ताईनगर येथील संच वाटपाचे काम सुरू आहे. नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनी या मोफत योजनेचा लाभ घ्यावा. तसेच खाजगी एजंटांकडून नागरिकांची लूट होत असते म्हणून त्यांना कोणीही पैसे देऊ नये.
स्थानिक ठिकाणी आ. चंद्रकांत पाटील यांनी कॅम्पचे आयोजन केल्याने तालुक्यातील नागरिकांची भटकंती थांबली आहे.



