जळगाव सहनियंत्र कक्ष चे अधिकारी यांचे वासो कार्यालयीन बैठकीत झालेल्या निर्णयाची पायमल्ली……..

महाराष्ट्र शासन वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा जळगाव येथील जिल्हा सहनियंत्र कक्ष चे अधिकारी यांचे वासो कार्यालयीन बैठकीत झालेल्या निर्णयाची पायमल्ली
जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग वरिष्ठ भूवैज्ञाने भूजल सर्वर आणि विकास यंत्रणा जळगाव येथील जिल्हा सहनियंत्रकक्ष शासकीय सुट्टीच्या दिवशी सुद्धा बंद ठेवण्यात आलेला आहे. परंतु वासो कार्यालयाचे दिनांक 13 /5 /2025 रोजी झालेल्या बैठकीच्या सूचनाने असे सूचना देण्यात आलेले होते की सदर सहनियंत्रकक्ष व संरक्षण अंतर्गत जिल्हा सन 2025 – 26 या वर्षातील मान्सूनपूर्व अभियान जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद जळगाव यांच्या दिनांक 16 /4/ 2025 ते 31/ 5/ 2025 या नियोजित वेळेप्रमाणे वेळापत्रक कालावधीमध्ये राबविण्यात येत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या प्राप्त नमुन्याची रासायनिक तपासणी विहित वेळेत होणे आवश्यक आहे त्याकरिता प्रयोगशाळा शासकीय सुट्या दिवशी कार्यरत ठेवण्याबाबत असे पत्र वरिष्ठ भूवैज्ञाने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा जळगाव येथील जिल्हा सह नियंत्रक कक्ष यांना देखील या पत्राचा काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे जेणेकरून विहित नमुन्यामध्ये आलेले पाण्याच्या स्त्रोचाची नमुन्याची रासायनिक तपासणी विहित वेळेत होणे यावी याकरिता हे पत्र निर्माण करण्यात आले होते परंतु. जिल्हा सहनियंत्रकक्ष देखील आज सुट्टीच्या दिवशी शासकीय सुट्टी वगळता सुरू ठेवण्याचे पत्र असताना देखील आज दिनांक 17 /5 /2025 वार शनिवार या दिवशी हे कोणाच्या आदेशान्वये बंद करण्यात आलेले आहे.
यांचे वरिष्ठ अधिकारी वर्षा जैन मॅडम यांनी अजून पर्यंत उत्तरे दिलेले नाहीत त्यांना फोन केले असता फोन उचलले नाही अशा भोंगळ कारभारामध्ये सुरू असलेला ह्या अधिकाऱ्यांवरती कधी कारवाई होईल.
आपल्या मनमानी नुसार हे आदेशांचे पायमल्य करताना दिसून येत आहेत.
जिल्हा सह नियंत्रक कक्ष हे तालुक्याच्या इतर कर्मचाऱ्यांचे सेंटर असून देखील या ठिकाणी अशा पद्धतीचे कामकाज होत आहे. या भोंगळ कारभारावरती कधी कारवाई होणार आयुक्त यांचे या जलगाव जिल्हा येथील कार्यालयावरती दुर्लक्ष झाले की काय असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे? जिल्हा सह नियंत्रक कक्षातील अधिकारी यांच्या मनमानी कारभार दिसून येत आहे?



