क्राईमगुन्हेगारीबुलढाणामलकापूरमलकापूरमहाराष्ट्र

मलकापूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ₹६० हजारांचा मुद्देमाल जप्त, दोन महिला अटकेत

बसमधील मंगळसूत्र चोरीचा पर्दाफाश; अवघ्या काही तासांत दोन महिलांना बेड्या

मलकापूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ₹६० हजारांचा मुद्देमाल जप्त, दोन महिला अटकेत

मलकापूर, दि. ३ : प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत बसमध्ये मंगळसूत्र चोरी करणाऱ्या दोन महिलांना मलकापूर शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करत गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला आहे. आरोपींकडून सुमारे ₹६० हजारांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

मलकापूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक गिरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला. तक्रारदाराच्या माहितीनुसार तातडीने तपास सुरू करून संशयित महिलांचा शोध घेण्यात आला. चौकशीदरम्यान दोघींनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून २ ग्रॅम सोन्याची मंगळसूत्राची पोत (अंदाजे ₹२० हजार) तसेच ४ ग्रॅम वजनाचे कानातील दागिने (अंदाजे ₹४० हजार) असा एकूण ₹६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने केली. पुढील तपास पोलीस कर्मचारी करत असून, या आरोपींकडून अशाच प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button