बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

मध्य रेल्वेच्या भादली स्थानकावरील नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे १४ गाड्या रद्द

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

शेगाव प्रतिनिधी:-सागर रावणचोरे

शेगाव : – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भादली स्थानकावर इगतपुरी-भुसावळ दरम्यान भादली-जळगाव पाचव्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पांतर्गत यार्ड पुनर्रचना व नवीन मार्ग जोडणीसाठी नॉन-इंटरलॉकिंगचे महत्त्वाचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे ११ ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अनेक गाड्या रद्द, मार्ग बदलून, नियमन करून तसेच पुनर्निर्धारित वेळेनुसार चालविण्यात येणार आहेत. रद्द केलेल्या गाड्यांमध्ये गाडी क्र. ५९०७५ नंदुरबार-भुसावळ पॅसेंजर १२ ऑगस्ट रोजी नंदुरबारहून रद्द तर गाडी क्र. ५९०७६ भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर १२ ऑगस्ट रोजी भुसावळहून, ०१२१२ नाशिक रोड-बडनेरा विशेष १२ ऑगस्ट, डी क्र. ०१२११ बडनेरा-नाशिक रोड विशेष १२

भादली BHADLI

ऑगस्ट, १९००५ सूरत-भुसावळ एक्सप्रेस ११ ऑगस्ट, १९००६ भुसावळ-सूरत एक्सप्रेस १४ ऑगस्ट, ११११९ इगतपुरी-भुसावळ मेमू १२ ऑगस्ट, १११२० भुसावळ-इगतपुरी मेमू १२ ऑगस्ट, ११११३ देवळाली-भुसावळ मेमू १२ ऑगस्ट, ११११४ भुसावळ-देवळाली मेमू १२ ऑगस्ट, १९००३ दादर-भुसावळ विशेष १२ ऑगस्ट, १९००४ भुसावळ-दादर विशेष १२ ऑगस्ट, १९०१३ भुसावळ-कटनी एक्सप्रेस

१२ ऑगस्ट, तर १९०१४ कटनी-भुसावळ एक्सप्रेस (१४ ऑगस्ट रोजी रद्द राहणार आहे. तसेचं मार्ग बदलून चालविण्यात येणार्या गाडी क्र. १७०१९ हिसार-हैदराबाद एक्सप्रेस गाडी क्र. १२७१६ अमृतसर-नांदेड एक्सप्रेस या दोन्ही गाड्या भुसावळ सी केबिन (कॉर्ड लाइन)- अकोला-पूर्णा मार्गे धावतील. नियमन करण्यात आलेल्या गाडी क्र. १२६२७ बेंगळुऊश्-नवी दिल्ली एक्सप्रेस (१ तास ३५ मिनिटे) गाडी क्र. ११०५५ लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर एक्सप्रेस (१ तास ४० मिनिटे), १२६२९ यशवंतपूर- हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (१ तास ३० मिनिटे), १२३६२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-आसनसोल एक्सप्रेस (१ तास २५ मिनिटे), ११०६१ लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्सप्रेस (१ तास

०५ मिनिटे), ११०५८ अमृतसर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (१ तास ५५ मिनिटे), २२५३७ गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (१ तास ४० मिनिटे), ११०६२ जयनगर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (१ तास ३० मिनिटे), ११०४० गोंदिया-कोल्हापूर एक्सप्रेस (१ तास १५ मिनिटे), २२५८९ बनारस हडपसर अमृत भारत एक्सप्रेस (३ तास), २०६२५ एमजीआर चेन्नई सेंट्रल-भगत की कोठी एक्सप्रेस (२ तास) यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे गाडी क्र. २२५९० हडपसर-बनारस एक्सप्रेस १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.२० वाजता सुटेल. या गाडीची नियोजित वेळ सकाळी ७.५० वाजता होती. असे रेल्वे कडून कळवीण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button