महाराष्ट्रातील सर्पमित्रांना आमदार अमित झनक सह 51 आमदारांचा पाठिंबा पूर्ण

*महाराष्ट्रातील सर्पमित्रांना आमदार अमित झनक सह 51 आमदारांचा पाठिंबा पूर्ण
*वाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाड
(वाशिम : – संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्पमित्रांच्या प्राणी मित्रांच्या विविध मागण्या1) सर्व सर्पमित्रांना प्राणी मित्रांना अपघाती विमा (प्राणी मित्र विमा) व सर्पदंश उपचार विमा मिळणे2) सर्पमित्रांच्या प्राणी मित्रांच्या सेवेला अत्यावश्यक सेवा या (फ्रंटलाइन वर्कर) सदरामध्येसमाविष्ट करून घेणे.3) प्रशासकिय सेवेचे सर्पमित्र प्राणी मित्र ओळखपत्र मिळणे) गावपातळीपासून शहरामध्ये जवळपास प्रत्येक जिल्हयात घराघरात ओफीस शेत गोठे अशा मानवाच्या व पाळीव प्राण्याच्या राहण्याच्या ठिकाणी विषारी व बिनविषारी साप निघतच असतात. आपणास माहितच आहे की विषारी सापांच्या वित्त हानी या धोका संभवतो बरेचदा अपघाताने अनावधानाने किंवा सापा अज्ञानामुळे घडूनयेते शिवाय बन्याचशा ठिकाणी वरील सारख्या घटनामुळे अज्ञान व भिती पोटी कितीतरी सापांची दिसता वेळीच ठेवुननिर्घुण हत्या केली जाते. त्यापैकी बरेच साप बिनविषारीपण असतात.वरिल दोन्ही प्रसंगातून तळागाळातील निष्ठावंत सर्पमित्र प्राणी मित्र हे वेळोवेळी धोका पत्करून आपल्या कौशल्याचा उपयोग करून घटनास्थळी हजर होतात असे विचारी व बिनविषारी साप पकडतात व लगेच त्यांना जंगलात किंवा सुरक्षित ठिकाणी वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सोडतात.सर्पमित्र प्राणी मित्र पुर्ण निष्ठेने अहोरात्र करत असतात साप हे प्रामुख्याने उदीर खातात, उदीर हे उभ्या पिकांची तसेच साठवलेल्या पायाचीणीय प्रमाणात नासाडी करतात एका अभ्यासानुसार अंदाजे 15-20 टक्के अन्न धान्याच्या पिकाचे नुकसान हे उंदीर करीत असतात. है सर्वगुकसान साप टाळत असतात, तसेच साप हा मानवी अन्नसाखळीतील महत्वाचा घटक आहे असा हा घटक केवळ शेतकऱ्यांचा नाही तर संपूर्ण मानवजातीचाच मित्र आहे आणि यांचे नैसर्गीक संतुलन राखण्यासाठी सर्वसामांचा प्राणीमित्रांचा सुध्दा खूप मोलाचा वाटा आहे.साप व प्रत्येक वन्यजीव जरी मोलाचा असेल तरी सर्पमित्र हा लाख मोलाचा आहे अशा या सर्पमित्रांना प्राणी मित्रांचाआपातकालीन परिस्थिती रस्त्यावरील वाहनांच्या अपघातापासून सर्पदंश व त्यामुळे होणारे मृत्यु यांसारखे धोके कोणत्याही क्षणी येवु शकतात त्यामुळे सर्पदंश होवुन सर्पमित्रांचा प्राणी मित्रांचा अपघात किंवा मृत्यु झाल्यास त्यांना अपघात विमा (प्राणी मित्र विमा योजने अंतर्गत त्यांना किंवा त्याच्या कुटूंबीयांना रुपये 10 लाख अपघाती विमा मंजूर करण्यात यावा. सर्व सर्पमित्र प्राणी मित्र हे सहसा मध्यम किंवा गरिब वर्गातील आहेत. अशा प्रसंगी अपघात वा सर्पदेश होताच मोठया खर्चाची पुर्तता करणे त्यांना शक्य नसते म्हणुन त्याना अपघात झाल्यानंतर उपचारा दरम्यान आर्थिक अर्थसहाय्याची गरज भासते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्पमित्रांना प्राणी मित्रांना आरोग्य विम्यामध्ये समाविष्ट करण्यात यावे.तसेच त्यांच्या या समाजाभिमुख समाजउपयोगी व निसर्गरक्षणच्या कार्याला उचित सन्मान मिळण्यासाठी त्यांच्या सेवेला अत्यावश्यक सेवेचा कट लाईन वर्कर दर्जा मिळणे आवश्यक आहे. आजपर्यंत हा संदेचा भाग दुर्लक्षीत राहीला होता. आजपर्यंत सर्पमित्राची प्राणी मित्रांची कुठल्याही सरकारने किंवा लोकप्रतिनिधीने व राजकिय पक्षाने दखल घेतली नव्हती त्यामुळे आमच्या सर्व मागण्या मान्य होतील अशी आख्या महाराष्ट्रातील सर्पमित्रांची / प्राणी मित्रांची आपल्याकडून अपेक्षा आहे.तरी या बाबी आपल्या सरकारच्या नजरेत आणुन देगे हे आमच्या सर्पमित्रांच्या प्राणी मित्रांच्या वतीने कर्तव्य समजतो. शिवाय यासाठी जागोजागी होणारी अडवणुक वा संशय यांचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडुन महाराष्ट्रातील संपूर्ण सर्पमित्रांना प्राणी मित्रांना ओळखपत्र मिळावी माफक अपेक्षा महाराष्ट्रातील सर्व सर्पमित्रांच्या प्राणी मित्राच्या वतीने आम्ही आपणास करीत आहोत तरी आपण आपल्या स्तरावरून आमच्या सर्पमित्रांच्या प्राणी मित्रांच्या मागण्या या न्याय व योग्य समजून घेव्या.



