अपघात

भरधाव दुचाकीची इनोव्हा कारला समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

मुक्ताईनगर प्रतिनिधी :-

हरताळा फाटा येथील हनुमान मंदिरासमोर गुरुवारी (दि. 12) झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने इनोव्हा कारला समोरून धडक दिल्याने हा अपघात घडला.
याबाबत प्रवीण जगन्नाथ गायकवाड (वय 36, व्यवसाय चालक, रा. गिगाव, पोस्ट सायने बुद्रुक, ता. मालेगाव, जि. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते दत्तात्रय पाटील (रा. मालेगाव) यांच्या मालकीची इनोव्हा कार (एमएच 41 सी 5290) चालवत होते. सदर कारने ऋषिकेश पाटील व त्यांची आजी यांना मालेगावहून अकोला येथे घेऊन जात असताना मुक्ताईनगरजवळील हरताळा फाटा येथे अपघात झाला.
दरम्यान, एमपी 68 झेड ए 6725 क्रमांकाची दुचाकी विरुद्ध दिशेने डिव्हायडरलगत भरधाव वेगात येत होती. त्या दुचाकीवर दोन पुरुष व एक महिला असे तिघेजण बसले होते. चालकाने कारचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक दाबले, मात्र दुचाकीस्वाराने नियंत्रण गमावल्याने तो थेट कारला समोरून धडकला. धडकेनंतर दुचाकीस्वार कारच्या बोनेटवर येऊन आदळला व त्याचे डोके समोरील काचेला आपटले. त्यानंतर तो खाली पडला. दुचाकीवरील इतर दोघेही रस्त्यावर पडून जखमी झाले.
अपघातात राजू श्यामा मावसकर (वय 40, रा. लालबडली डोईफोड्या, ता. खकनार, जि. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मोटरसायकल चालक उमर रफिक खान (वय 27) व ननकीबाई सुभाष मावसकर (वय 45, दोघेही रा. लालबडली डोईफोड्या, ता. खकनार, जि. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघातानंतर फिर्यादी व परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. मुक्ताईनगर व हरताळा परिसरातील नागरिक तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांचे भाचे व बांधकाम व्यावसायिक तुषार बोरसे यांनी जखमींना त्वरित रुग्णवाहिकेतून मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button