खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीयसंपादकीय

ब्राम्हण्यवादाचा भारतीय राजकारणावर प्रभाग.

ब्राम्हण्यवादाचा भारतीय राजकारणावर प्रभाग.
भारतखंड मुळातच धार्मिक विचारधारा जपून आहे.धर्म कोणी शाळा, कॉलेजमध्ये शिकवत नाही.तो माता,पिता,गुरू यांच्या विचारातून, वर्तनातून प्रभाव करतो.कथा,किर्तन, प्रवचन हा त्याचा शिस्तबद्ध प्रकार आहे.जो धर्मावर शिक्कामोर्तब करतो.मनावर बिंबवतो.इतका कि ,कितीही वैज्ञानिक , यांत्रिक, तांत्रिक शिक्षण घेतले तरीसुद्धा ते पुसले जात नाही,विसर पडत नाही.धर्म ही वास्तवता नाही, संकल्पना आहे तरीही ती मानवाच्या वास्तविक जिवनावर मोठा प्रभाव करते.जितका तिचा विरोध केला, तिरस्कार केला,त्याग केला तितकी ती अधिक आधिक घट्ट होते.धर्म आणि मानवी मन हे समीकरण कोणालाही तोडता आले नाही.अर्थात मानवी मनातून धर्म या संकल्पनेचा उगम झाला.धर्म संकल्पनेतूनच देव या संकल्पनेचा उगम झाला.मानवाने देव जन्माला घातला.म्हणून मानव हाच देवाचा बाप आहे. मॅन इज द फादर ऑफ गॉड. जरी मानव देवाला बाप म्हणत असला तरीही.
धर्माचे पालन करणारा, धर्म सांगणारा माणूस,ज्याचा भिन्न धर्मात , भिन्न भाषेत भिन्न नावाने उल्लेख केला असला तरीही भुमिका मात्र तिच आहे.हिंदू धर्मात त्याला ब्राह्मण म्हणतो.ब्राम्हण ही जात जमात मानली तरीही ब्राह्मण्य ही गुणवत्ता,विशेषण असणे आवश्यक आहेच.ठळकपणे जन्माने ब्राह्मण म्हटले तरीही गुणाने आणि कर्माने तो ब्राह्मण असणे आवश्यक आहेच.ते मात्र टिकून आहे.युगानुयुगे ब्राह्मण्य टिकवून ठेवणे हे खूप कठीण काम आहे.आहेच.ते वास्तव आहेच.मी, तुम्ही कितीही नाकारले,धिक्कारले तरीही ते टिकून आहे.ते प्रभावी आहे.
या ब्राम्यण्यवादाचा प्रभाग भारतीय समाजावर तर आहेच पण राजकीय, शासकीय, प्रशासकीय क्षेत्रात सुद्धा टिकून आहे.मुलनिवासी आणि बहुजन समाज याची शाब्दिक हेटाळणी,कुटाळणी करीत असला तरीही तो कृतीत मात्र स्विकारतो.यातील गमक जाणणे आवश्यक आहे.नंतर ते चांगले कि वाईट ठरवता येईल.
भारतीय राज व्यवस्थेवरचा ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा प्रभाव कमी करुन मुलनिवासी व बहुजनांचा प्रभाव वाढवण्यासाठी भारतीय राज्यघटना मुलनिवासी बुद्धीमान,ज्ञानी, नीतिमान व्यक्तीने लिहावी.ही सुचना नेहरूंनी केली.भारतीय राज व्यवस्था जमीनीवरच्या माणसाने, जमीनीवरच्या माणसासाठी लिहीली तर प्रत्येक माणसाला सारखाच राजकीय अधिकार प्राप्त होऊ शकतो.म्हणून ही जबाबदारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेकडे सोपवली.ती त्यांनी चोख पार पाडली.ज्यात आपल्या मुलनिवासी बांधवांचे आणि बहुजन समाजाचे हित साधण्याचा प्रयत्न केलेला आहे.सत्तर वर्षे ओढून ताणून असे हित साधण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांनी केला.परिणाम जाणवले.पण हाच वर्ग मात्र आपले हित साधण्यात अपयशी ठरलेला आहे.त्याचा दोष ब्राह्मणवादाला देत आहे.
भारतीय राज्यघटनेत सर्वाधिक महत्त्वाचा आधिकार म्हणजे मताचा अधिकार.एका व्यक्तीला एकच अधिकार.प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार.राज्यघटनेचा हाच मुळ आत्मा आहे.तो सोडला तर इतर भागात विधानसभा आणि लोकसभेची संरचना आहे.हा मताचा अधिकार म्हणजे माझ्या विचारांचा,माझ्या आचारांचा,माझ्या हिताचा,माझ्या मताचा प्रतिनिधी विधानसभा आणि लोकसभेत पाठवणे.पण त्या मताधिकाराचे महत्त्व मुलनिवासी आणि बहुजन समाजाला नाही.मत विकून बदल्यात खान ,पान, पैसा मिळवून देणारी ती अदृष्य मालमत्ता मानतो.आपण न मागता मिळालेली ती मालमत्ता आहे.असेट आहे.कितीही वेळा विकली,फेकली तरीही पुन्हा पुन्हा प्राप्त होते.जसे झाडाचे फळ.तोडा आणि विका.पुन्हा येते.पुन्हा तोडा आणि विका.निर्धास्त राहा.फळे येणे थांबले कि तेच झाड तोडून लाकडे विका.पुन्हा दुसरे झाड उगेल.ती निसर्गाची जबाबदारी आहेच.आपली नाहीच.
मुलनिवासी आणि बहुजन समाज वस्तुंचा संग्रह करतो.ज्ञानाचा संग्रह करीत नाही.आग्रह करीत नाही.त्यासाठी बुद्धीमान व नीतिमान माणसांचाही तिरस्कार,त्याग करतो.वाटते ,मरतांना ही मालमत्ता सोबत नेता आली तर बरे होईल.अजून पर्यंत कोणालाही नेता आली नाही,हे माहीत असूनही.हेच मोठे आश्चर्य आहे.हिच मोठी उणीव आहे.हिच मोठी खोंच आहे .इट इज द रिडल ऑफ लाईफ. याच वृत्तीमुळे तो कुबेराच्या घरात राहात असूनही कंगाल आहे.राजाच्या महालात राहात असूनही रंक आहे.आधिकाराचा धनी असूनही निराधार आहे.कारण त्याला अजूनही कुबेराचे,राजाचे,आधिकाराचे महत्त्व कळलेले नाही.
मुलनिवासी व बहुजन समाजाला मताचे महत्त्व कळत नाही,वळत नाही तोपर्यंत तो या अवस्थेतून बाहेर पडणार नाही.

…. शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button