सामाजिक

प्रहार व लोकजार मंचच्या वतीने भव्य दिव्य हळदी कुंकवाचा सोहळा!, कार्यक्रमाला तब्बल ३५०० महिलांची होती उपस्थिती, महिलांचा हसुन हसुन झाला होता बट्याबोळ! शहरात प्रथमच अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर यांचे होते आगमन.स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसविजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.०७ ; तेल्हारा शहरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल भाऊ गावंडे यांच्या वतीने तेल्हारा येथील भागवत मंगल कार्यालयाच्या लॉन वर भव्य-दिव्य हळदीकुंकू सोहळ्याचे सोमवार दि.०५ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते संध्याकाळी ठिक ०६: ३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली असुन , या सोहळ्या करिता शहरात प्रथमच प्रसिद्ध सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर व त्यांच्या कन्या सह्याद्री यांचे आगमन झाले होते .त्यांच्या विनोदी करामतीने कार्यक्रमात महिलांचा हसुन हसुन बट्याबोळ झाला . या हळदीकुंकवाच्या सोहळ्याला तब्बल साडेतीन हजार महिलांनी उपस्थिती लगावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या सोहळ्यामध्ये विविध प्रश्न ,विनोदी उखाणे ,नृत्य आधी स्वरूपाच्या हास्यमालेचे सादरीकरण अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर व सह्याद्री यांनी केले .लोकजागर मंच हे सतत नागरिकांकरिता अशा प्रकारचे विविध कार्यक्रम हे अनेक वर्षापासुन आयोजित करत आहे अशा प्रकारचे सोहळे भव्य दिव्य स्वरूपात पार पाडण्याकरिता लोकजागर मंच लवकरच एक मोठे विदर्भ नावाचे संघटन तयार करणार असल्याचे अनिल भाऊ गावंडे यांनी सांगितले. या सोहळ्या अंतर्गत प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या महिला विजेत्यांना बक्षीस स्वरूपात असंख्य पैठणीचे वितरण करण्यात आले , तसेच या हळदी कुंकु सोहळ्यात आलेल्या सर्व महिलांना आकर्षक वानं सुद्धा देण्यात आली. वानांच्या वितरणानंतर उत्तम जेवणाची मेजवानीही आयोजकांतर्फे करण्यात आली होती. गत तीन वर्षापासून विविध शहरात हळदी कुंकू सोहळ्याचे अनिल भाऊ गावंडे नियमित आयोजन करत असतात .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button