मेजर अशोक वाघ यांची देऊळगाव राजा प्यारा मिलिटरी असोसिएशन तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा | दि. 27 सप्टेंबर 2026
ऑल इंडिया पॅरामिलिटरी आजी-माजी सैनिक असोसिएशन, जिल्हा शाखा बुलढाणा यांच्या वतीने दिनांक 27/09/2026 रोजी जिल्हाध्यक्ष मेजर विठ्ठल काकड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा कोअर कमिटी टीम व बुलढाणा जिल्ह्यातील विविध तहसील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संघटनात्मक बैठक व कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तहसील अंतर्गत तालुका अध्यक्षांची निवड व जबाबदारी सोपविण्याची प्रक्रिया पार पडली.
यावेळी देऊळगाव राजा तालुका अध्यक्षपदी मेजर अशोक वाघ साहेब यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष मेजर विठ्ठल काकड साहेब यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून देऊळगाव राजा तालुक्यातील संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली.
मेजर अशोक वाघ यांच्या नियुक्तीमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील आजी-माजी पॅरामिलिटरी सैनिक, वीर नारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या नियुक्तीबद्दल संपूर्ण ऑल इंडिया पॅरामिलिटरी आजी-माजी सैनिक असोसिएशन, जिल्हा शाखा बुलढाणा परिवारात आनंदाचे वातावरण असून, मेजर अशोक वाघ साहेब यांचे सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा



