खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्ररावेर

गांधी जयंतीनिमित्त रावेर तहसीलमध्ये स्वच्छतेचा जागर!

‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा संकल्प मोहिमेत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा
रावेर ता. प्रतिनिधी – विकास आमोदकर

रावेर, दि. २ ऑक्टोबर २०२६ :
‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत सेवा संकल्प मोहिमेच्या माध्यमातून महात्मा गांधी जयंतीनिमित्त रावेर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबविले. स्वच्छता ही केवळ मोहीम न राहता ती दैनंदिन जीवनशैली बनावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रावेर तहसील कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन तहसीलदार संजय तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालय तसेच परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला.

या अभियानात नायब तहसीलदार रवींद्र पाटील, किशोर पवार, भूषण कांबळे, अजित टोंगळे, सचिन पाटील, दत्तात्रय मांडवकर, गणेश सावळे, दीपक खैरनार, प्रतीक सूर्यवंशी, घनश्याम राठोड, विक्रम राठोड, आशुतोष गेटे, किशोर चौधरी, सुनील सोनार, सलीम तडवी, फिरोज तडवी, लक्ष्मी तुरकुले, श्रद्धा गजरे, अंजुम तडवी, ज्योती पाटील, अर्चना महाले यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.

यावेळी पत्रकार दीपक नगरे, तुषार मानकर, चंद्रकांत विचवे, विनोद कोळी, भाजपा मंडल अध्यक्ष दुर्गेश पाटील, राजू सवरणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

महात्मा गांधी यांनी स्वच्छतेला दिलेले महत्त्व लक्षात घेऊन स्वच्छ भारताचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button