बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

चुलीवरचा बाबा गरम तव्यावर कसा बसला?

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
सत्यपाल महाराजांनी थेट डेमोच करून दाखवला

भंडारा | गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक प्रकार समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी पाण्यावर तरंगणारे बाबा समोर आले होते. त्यानंतर तवा बाबा चर्चेत आले होते. अमरावतीमध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार पुन्हा समोर आल्यानंतर तवा बाबाची पोलखोल करण्यात आली आहे. सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांनी तवा बाबाची पोलखोल केली आहे.

भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील निलज फाट्यावरील एका झुणका भाकर केंद्रावरील तव्यावर तब्बल तीन मिनिटे बसून खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांनी तवा बाबांच्या दाव्याची पोलखोल केली. ही कोणतीच जादू नाही, चमत्कार नाही, भानामती नाही. हा संदेश देण्यासाठी महाराजांनी हा प्रयोग करून सोशल मीडियावर जनजागृतीसाठी व्हिडीओ व्हायरल केला.

गरम तव्यावर बसल्यावर चटका का लागत नाही, याचही करण महाराजांनी सांगितले आहे. काळ्या रंगाचा कपडा पूर्ण ओला करून तव्यावर ठेवला, नंतर अंतर वस्त्र आणि कमरेला बांधलेला दुपट्टा सुद्धा पूर्ण ओला केला. हा सगळा प्रकार करून ते तव्यावर साधारण तीन ते चार मिनिटे नीट बसलेले होते.

ओले कपडे असल्यामुळे तव्यावर सत्यपाल महाराजांना चटका लागला नाही. असाच प्रयोग अमरावतीमधील भोंदू बाबाने करून दाखवला. हे सत्य उघड पाडण्यासाठी सत्यपाल महाराजांनी प्रयोग केला.

आता जादू टोना, भूतबाधा, करणी टोटका, भानामती असे प्रकार नसतात ही अंधश्रद्धा आहे, हे सगळ्यांच्या लक्षात आले असेलच त्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button