पत्रकारबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

ज्येष्ठ संपादक जगदीशजी अग्रवाल यांच्या वाढदिवसा निमित्त अग्रवाल हॉस्पिटल येथे 2 मे रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिरखामगाव प्रेस क्लब, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि राज्य मराठी पत्रकार परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

खामगाव:- खामगाव प्रेस क्लबचे सल्लागार, ज्येष्ठ संपादक, समाजसेवक श्री. जगदीशजी अग्रवाल यांच्या वाढदिवसा निमित्त दि. 2 मे मंगळवार रोजी अग्रवाल हॉस्पिटल, जलंब रोड, गोकुळ नगर, थेटे हॉस्पिटल जवळ खामगाव येथे सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वरील आयोजन हे खामगाव प्रेस क्लब, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि राज्य मराठी पत्रकार परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश अग्रवाल आणि स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. शारदा अग्रवाल हे रुग्णांची तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन देणार आहेत. शिबिरामध्ये बी.एम.डी. टेस्ट म्हणजे हाडाच्या ठिसूळतेची मशीनद्वारे तपासणी, हिमोग्लोबिन टेस्ट, ब्लड शुगर टेस्ट मोफत करण्यात येणार आहे. तसेच एक्स-रे आणि गर्भवती मातांची सोनोग्राफी तपासणी शुल्क मध्ये 50% सूट राहील. तरी संबंधित रुग्णांनी अग्रवाल हॉस्पिटलच्या मो. नं. 8605779989, 7218998933 वर नाव नोंदणी करून या सुवर्ण सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्व पत्रकार संघटनांतर्फे व सर्व पत्रकार पदाधिकारी व सदस्यगण यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button