बुलढाणामहाराष्ट्रविदर्भशेती

निष्कृष्ट सोयाबीन बियाण्याचा फटका; आसलगावातील शेतकऱ्यांची पेरणी वाया….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

जळगाव जामोद:- १५ जुलै २०२६
‘बूस्टर’ कंपनीच्या ‘हू तू तू’ सोयाबीन बियाण्याविरोधात शेतकऱ्यांचा संताप पंचनामा करून नुकसानभरपाईची मागणी जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथे यंदाच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने ‘बूस्टर’ कंपनीच्या ‘हू तू तू’ या सोयाबीन बियाण्याची लागवड केली. मात्र पेरणीनंतर अनेक दिवस उलटूनही बियाण्याची उगवण झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित बियाणे निष्कृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, अनेकांच्या शेतातील बियाणे जमिनीतच कुजल्याचा दावा करण्यात आला आहे.
यावर्षी वेळेवर पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने बियाणे, खते व मशागतीची कामे पूर्ण करून पेरणी केली होती. मात्र अपेक्षित उगवण न झाल्याने संपूर्ण पेरणी वाया गेली आहे. आता पुन्हा पेरणी करण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट ओढवले आहे. बियाण्याचा खर्च, मशागत, मजुरी आणि इतर खर्च वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या प्रकारामुळे बाळू डाबेराव, रतन डाबेराव, हरिदास इंदोरे, अनिल रावण चौरे यांच्यासह आसलगाव व परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. संबंधित बियाण्याची तातडीने चौकशी करून कृषी विभागाने शेतात प्रत्यक्ष पाहणी करावी, पंचनामा करावा आणि दोषी कंपनीवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात अशा निष्कृष्ट बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी होत आहे. कृषी विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित बियाण्याची गुणवत्ता तपासावी आणि शेतकऱ्यांना तातडीने न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे…….✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button