बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

सोनाळा येथे ‘सेवा संकल्प’ अंतर्गत NCD तपासणी व जनजागृती ;भटक्या-विमुक्त नागरिकांची आरोग्य तपासणी; निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

बुलढाणा, दि. ३० : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील भटक्या व विमुक्त जाती-जमातीतील नागरिकांना विविध शासकीय आरोग्य सेवा व योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘सेवा संकल्प’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत सोनाळा येथील मंडल अधिकारी कार्यालयात असंसर्गजन्य आजार (NCD) तपासणी व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

या उपक्रमात उपस्थित नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, वजन, उंची व बॉडी मास इंडेक्स (BMI) आदी तपासण्या करण्यात आल्या. तपासणीदरम्यान आरोग्यविषयक समस्या आढळलेल्या नागरिकांना आवश्यकतेनुसार पुढील तपासणी व उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थेकडे संदर्भित करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग व कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार आणि नियमित व्यायामाचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगण्यात आले. तसेच तंबाखू, गुटखा व धूम्रपानाचे सेवन टाळण्यासोबतच मद्यपानापासून दूर राहण्याबाबत आरोग्य शिक्षण व समुपदेशन करण्यात आले.

यावेळी पात्र नागरिकांना उपलब्ध असलेल्या विविध शासकीय आरोग्य सेवा व योजनांची माहिती देण्यात आली. आरोग्यविषयक समस्या असलेल्या लाभार्थ्यांना पुढील उपचार, तपासणी व आवश्यक आरोग्य सेवांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

भटक्या व विमुक्त जाती-जमातीतील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी अशा प्रकारचे तपासणी व जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, नागरिकांनी उपलब्ध शासकीय आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button