मलकापूरला टनकपूर–नांदेड सुपरफास्ट एक्सप्रेसचा थांबा; उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
प्रतिनिधी. मलकापूर रेल्वे स्थानकावर टनकपूर–नांदेड (17631/17632) सुपरफास्ट एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या गाडीच्या नव्याने मंजूर झालेल्या थांब्याचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सुविधेमुळे मलकापूर व परिसरातील प्रवाशांना दूरच्या प्रवासासाठी मोठी सोय उपलब्ध होणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चैनसुख संचेती होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेंद्रजी फिरके, ज्येष्ठ पत्रकार गजानन ठोसर, मनोज पाटील, इंडिया टीव्हीचे संदीप सावजी, डॉ. विशाल झंवर, जय कॉटचे नंदलाल गांधी, संजय भडगावकर, तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष पारसमल झाबक, स्टेशन मास्तर ठाकूर साहेब तसेच आरपीएफचे दीक्षित उपस्थित होते.कार्यक्रमात संदीप सावजी यांनी रेल्वे सेवांच्या विकासाबाबत मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात आमदार चैनसुख संचेती यांनी मलकापूर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे सांगत, आगामी काळात सुमारे ३ कोटी रुपयांची विकासकामे करण्यात येणार असल्याची घोषणा केली.यावेळी प्रवासी संघाचे शंकरभाई पटेल, जयंता गोदनकर, समीर जटाळे, आर. आर. चव्हाण, राजेंद्र ओझा, आलोक पानकर, ज्ञानदेव पाटील, देशमुख सर, प्रमोद संचेती, नंदकिशोर कोठारी, प्रकाश चोरडिया, भन्साली, भारत शहा, जितेंद्र लोडाया, अजित मेमन, जीआरपीचे तायडे साहेब, मोहेकार, मिलिंद डवले यांच्यासह अनेक रेल्वे प्रवासी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा प्रवासी (सेवा) संघाचे अध्यक्ष ॲड. महेंद्रकुमार बुरड यांनी केले.मलकापूर स्थानकावर टनकपूर–नांदेड सुपरफास्ट एक्सप्रेसला अधिकृत थांबा मिळाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले असून, या निर्णयामुळे परिसरातील रेल्वे प्रवास अधिक सुलभ होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



