रुईखेडे येथे आरंभ किलबिल पालक मेळाव्याचे आयोजन

मुक्ताईनगर प्रतिनिधी
आज दि.२० फेब्रुवारी २०२५ – जि.प.मराठी शाळा रुईखेडेच्या प्रांगणात एकात्मिक बालविकास सेवा योजना विभाग मुक्ताईनगर व गृप ग्रामपंचायत रुईखेडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रुईखेडे बीट स्तरीय आरंभ – क्षण सुरुवातीचे मोलाचे – हा पालक मेळावा आयोजित करण्यात आला.
या पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ.उषाताई गुरचळ व प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी श्री.दीपध्वज कोसोदे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका श्रीमती सुनीता पाटील मॅडम यांनी सादर केले तर पर्यवेक्षिका श्रीमती कल्पना तायडे व श्री.दीपध्वज कोसोदे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. सूत्र संचालन उपशिक्षक श्री.श्यामकांत रुले यांनी केले तर आभार श्रीमती सरीता दळमल मॅडम यांनी मानले. या मेळाव्यात ० ते ३ वयोगट असणाऱ्या बालकांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास करणाऱ्या खेळांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी ग्राम पंचायत सदस्य श्री.वासुदेवभाऊ बढे, श्री.हबीब कालू वंजारी, श्री.चंद्रकांत बढे, सौ.कविता श्रीराम सनांसे,श्री.अजयभाऊ गुरचळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.श्री.श्रीरामभाऊ सनांसे,ए.बा.वि.से.योजना पर्यवेक्षिका श्रीमती कल्पना तायडे मॅडम,श्रीमती सरीता दळमल मॅडम,श्रीमती सुनिता पाटील मॅडम, रुईखेडे बीट मधील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच रुईखेडे ग्राम पंचायत कर्मचारी, तसेच शाळेतील शिक्षक व पालक उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीेतेसाठी अंगणवाडी सेविका श्रीमती वत्सला सुरवाडे,श्रीमती अनुसया लोखंडे,श्रीमती शिला कोल्हे, श्रीमती आशा पाटील, मदतनीस श्रीमती चंद्रकला गुरचळ, श्रीमती सुजाता तायडे, सौ.डांगे, सौ.लोखंडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी शैलेश गुरचळ व अनिरुद्ध अजय गुरचळ यांनी अथक परिश्रम घेतले.



