बुलढाणामहाराष्ट्र

बालस्नेही पुरस्कार साठी अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची निवड

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे अकोला प्रतिनिधी

दि. 23 फेब्रु. 2025 : अमरावती विभागातून अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे ‘बालस्नेही पुरस्कार-२०२४’ अंतर्गत उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह यांनी ही निवड जाहीर केली असून मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दि. ३ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिका-यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, गृह राज्यमंत्री योगेश कदम, महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहतील. जिल्ह्यात बाल हक्क सप्ताहानिमित्त अनेक उपक्रम राबविण्यात आले. महिला व बालविकास भवन, वन स्टॉप सेंटरसाठी जागा मिळविणे, १०९८ स्टीकर्सवाटप, बालगृहातील बालकांना आवश्यक सुविधांची पूर्तता, बाल हक्क व मतदार जनजागृती तसेच बालविवाहाला प्रतिबंधासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button