खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

जळगाव | १ ऑक्टोंबर २०२६शहरातील एम.जे. कॉलेज परिसरातील गजानन चेंबरमधील ‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाने कारवाई केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. कॉफी शॉपच्या नावाखाली गाळ्यात लाकडी कपार्टमेंट तयार करून त्यांना पडदे लावण्यात आल्याचे तसेच या ठिकाणी मुला-मुलींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी विजय राजेंद्र पाटील (वय २९, रा. इंद्रानगर, खेडी, जि. जळगाव) याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचारी सुनिता तुकाराम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दामिनी पथकाला एम.जे. कॉलेज परिसरात असलेल्या गजानन चेंबरमधील ‘हेवन कॅफे’बाबत माहिती मिळाली होती. कॅफेमध्ये गाळ्याच्या आत लाकडी कपार्टमेंट करून त्यांना पडदे लावून अंधाराची व्यवस्था करण्यात आल्याची आणि शाळा-महाविद्यालयातील मुला-मुलींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे दामिनी पथकातील कर्मचारी तसेच पोलिस पथकाने कारवाईची तयारी केली. पोलिसांच्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार, पंचांना सोबत घेऊन ‘हेवन कॅफे’ येथे पाहणी करण्यात आली.पोलिसांच्या पाहणीत कॅफेमध्ये प्लायवुड, बोर्ड व पार्टिकलच्या साहाय्याने वेगवेगळी कपार्टमेंट तयार करण्यात आल्याचे आढळून आले. या कपार्टमेंटला पडदे लावण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या ठिकाणी काही जण आक्षेपार्ह वर्तन करताना दिसल्याचा दावा पोलिसांनी फिर्यादीत केला आहे. पोलिसांनी कॅफेचालकाकडे चौकशी केली असता त्याचे नाव विजय राजेंद्र पाटील असल्याचे समोर आले. कॅफेमध्ये कॉफी शॉपचा परवाना असल्याचे कोणतेही कागदपत्र दिसून आले नाही. तसेच कॉफी तयार करण्यासाठी आवश्यक कॉफी पावडर, साखर, गॅस किंवा इतर साहित्यही आढळून आले नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कॅफेच्या बाहेर कॉफी शॉपचा बोर्ड लावण्यात आला होता; मात्र आतमध्ये खाद्यपदार्थ किंवा कॉफी विक्रीची व्यवस्था न करता लाकडी कपार्टमेंट तयार करून त्यांना पडदे लावण्यात आले होते. या जागेचा वापर मुला-मुलींना बसण्यासाठी केला जात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ४.१० वाजता ही कारवाई करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी विजय राजेंद्र पाटील याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम १२९ व १३१(३) अन्वये कारवाई करण्यात आल्याचे कागदपत्रात नमूद आहे.या कारवाईमुळे महाविद्यालय परिसरातील कॅफे व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून, अशा ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button