ग्रामपंचायत आसलगांव येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे
आसलगाव ग्रामपंचायत येथे दि 12 जानेवारी सकाळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम ग्रामपंचायत सरपंच श्री विष्णू इंगळे,व प्रकाश शेठ ढोकणे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. गावातील प्रतिष्ठित नागरिक ढोले सर, देविदासजी घोपे, प्रकाश गावंडे, गणेश भाऊ गावंडे भोंगाळे साहेब, सुनील भाऊ डाबेराव, प्रशांत अवसरमोल, श्याम भाऊ देवताडु, सुनील भाऊ डिवरे, मंगेश बावस्कर, किशोर दाताळकर, दत्तू भाऊ दांडगे, मुन्ना रावणचौरे, राजू गायकवाड, रामेश्वर राखोंडे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सुद्धा राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले व गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते. ✍️



