महाराष्ट्रविदर्भ

तेल्हारा शहरामध्ये न प शाळा क्र. १ मध्ये मुख्याधिकारी न.प.तेल्हारा सतीश गावंडे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होताच..

*तेल्हारा शहरामध्ये न प शाळा क्र. १ मध्ये मुख्याधिकारी न.प.तेल्हारा सतीश गावंडे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होताच..

.*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा व्हि एम घोडे तालुका प्रतिनिधी तेल्हारा.दि.१५ तेल्हारा शहरांमध्ये न.प. शाळा नं १ मध्ये दिनांक १५ ऑगस्ट २०२३ मंगळवार रोजी ७६ वा स्वातंत्र्यदिन हा न.प. मुख्याधिकारी सतीश गावंडे यांच्या शुभ हस्ते असंख्य जनसमुदायाच्या उपस्थितीत सामुदायिक राष्ट्रगीताने राष्ट्रीय ध्वजाला सलामी देत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आनंदात पार पडला . ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपताच मंचावर मान्यवरांमध्ये तेल्हारा नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक सतीश गावंडे आजी-माजी सैनिक संघटनेचे सदस्य से बं विद्यालयाचे फापट सर श्री शिवाजी हायस्कूलचे सावरकर सर नगरपरिषद शिक्षण विभागाचे अग्रवाल सर यांच्यासह आदींची उपस्थिति होती यावेळी मंचावर हिंदू मुस्लिम सिख ईसाई आदी जाती धर्मांचा विविधतेने नटलेला भारत देशाचा दर्शन घडवणारा देखावा से ब प्राथमिक शाळेच्या वतीने सादर करण्यात आला करण्यात आला तसेच मंचावर देशभक्ति पर गीतांसह परकीय देशाचा ध्वज उतरवताना व प्रथमतः भारत देशाचा ध्वजारोहणाचा देखावा सादर करण्यात आला यावेळी उपस्थित जनसमुदायाकडून टाळ्यांचा खळखळाट झाला होता. हा देखावा संपताच नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश गावंडे नागरिकांना संबोधताना म्हणाले की आपण ९ ऑगस्ट २०२३ पासून मेरी मिट्टी मेरा देश, मिट्टी को नमन विरों का वंदन या कार्यक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करत आहोत त्या निमित्ताने आपल्या शहरात सुद्धा वसुधा वंदन ७५ वृक्षांची लागवड माजी सैनिकांचा सत्कार पंचप्रण शपथ व शिलाफलकाचे अनावरण हे सर्व कार्यक्रम तेल्हारा शहरात आयोजित केले संपूर्ण जिल्ह्यात नसेल असा भव्य दिव्य आजी-माजी सैनिकांचा सत्कार आयोजित केला त्याला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला यावेळी शाळांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली त्याबद्दल नगरपरिषद प्रशासनातर्फे मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व पुढे ते म्हणाले की आज देशाची परिस्थिती पाहता असे लक्षात येते की 15 ऑगस्ट व 26 जानेवारी ह्या दोन दिवसा पुरतच राष्ट्रभक्ती दिसून येते हे राष्ट्रभक्ती दोन दिवसा करिता मर्यादित न ठेवता प्रत्येक दिवसाला आपल्या कार्यातून दिसून आली पाहिजे देशाला आज खऱ्या राष्ट्रभक्तीची गरज आहे तर राष्ट्रभक्ती कशी करावी त्यावर त्यांनी सांगितले की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेवढी पाण्याची बचत विजेची बचत करता येईल तेवढी बचत करा व रोज पुस्तकांचे वाचन करा आणि उत्तोमत्तम आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा होईल यासाठी ध्यास घेतला पाहिजे तसेच यावेळी बोलत असताना त्यांनी उपस्थितांना आवर्जून सांगितले आपले शहर आपले घर व आपल्या घराच्या अवतीभवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे आणि दुसऱ्यांना अस्वच्छता न करू देणे ही पण एक प्रकारची राष्ट्रभक्ती आहे व ती काळाची गरज आहे मित्रांनो अस्वच्छतेमुळे 80 प्रकारचे आजार उत्पन्न होतात त्यामधील डेंगू मलेरिया सारखा ख़तरनाक जीव घेणा आजार जर झाला तर त्यामुळे आपली जीवित हानी होऊ शकते हे टाळण्यासाठी त्यांनी सर्वांना विनंती केली तसेच सर्व शिक्षकांना पालकांना विनंती केली आव्हान केले विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टीने त्यांना शास्त्रज्ञांचे चरित्र वाचायला प्रेरित करा त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करा त्यांना अवांतर पुस्तके वाचायला परावृत्त करा जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन कल्पना विकसित होतील आपल्यासमोर ज्या समस्या आहेत किंवा भविष्यात उत्पन्न झाल्या तर त्या समस्यांचा शोध घेण्यासाठी पर्यायी मार्ग काढण्यासाठी आपला हाच विद्यार्थी जेव्हा सक्षम पणे उभा राहील तेव्हा ही त्याची एक प्रकारची राष्ट्रभक्ती ठरेल व हीच राष्ट्रभक्ती आपल्या उपयोगात येईल, याकरिता आपल्यामध्ये प्रेम भावना आवड आपलेपणाची जाणीव निर्माण व्हावी असे यावेळी त्यांनी सांगितले सर्वात शेवटी परत संपूर्ण उपस्थित जनसमुदायाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांनी आपले भाषण संपवले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपरिषद शाळा क्रमांक एकचे कोरपे सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री शिवाजी हायस्कूलचे शांतीकुमार सावरकर सर यांनी मान्यवरांचे व उपस्थित सर्वांचे आभार मानून केले या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता रवी खुमकर नवल ताले प्रमोद भूतकर सौ देशमुख मॅडम रंधे मॅडम घुगरे मॅडम निंघोट मॅडम यांच्यासह नगरपरिषदेतील अधिकारी कर्मचारी तालुक्यातील विविध शासकीय निम शासकीय कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी कर्मचारी तसेच विविध संघटनांचे सदस्य राजकीय पक्षाचे पदाधिकारी व त्यांचे प्रतिनिधी पत्रकार बंधू व्यापारी वर्ग मोलमजुरी करणारे कष्टकरी मजूर आणि विद्यार्थ्यांसह दिव्यांग नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Back to top button