Uncategorized

तेल्हारा शहरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला ऐतिहासिक जगतगुरु संत तुकाराम महाराज चौक लोकार्पण सोहळा!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे प्रतिनिधी

तेल्हारा. दि. 23 फेब्रुवारी 2025 l
तेल्हारा शहरात रविवार दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त एक ऐतिहासिक ठेवा तसेच आठवण म्हणून व वाढत्या लोकसंख्येचा रहदारीस अडथळा निर्माण न व्हावा या हेतूने तेल्हारा नगर परिषदेचे प्रशासक सतीश गावंडे यांच्या संकल्पनेतून शहरातील मुख्य मार्गावरील या ‘टी-जंक्शनचे’ पुनर्निमान करण्यात आले असून रस्त्याच्या मध्यभागी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची लख्ख प्रकाशात भव्य तुळशी वृंदावनावर भाषित प्रतिमा , याबरोबरच वारकरी संप्रदायातील जगविख्यात भव्य साहित्य म्हणजेच टाळ , मृदुंग , विना इत्यादींची स्थापना करण्यात आलेली आहे . या भव्य लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी चौकात भव्य , कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री आकाश दादा फुंडकर यांची पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे प्रथमच तेल्हारा शहरात आगमन झाले असून त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. सोबतच या सोहळ्याला जळगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय कुटे, अकोट तेल्हारा विधानसभा मतदार संघाचे आम. प्रकाश भारसाकडे मा. आम. गव्हाणकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अनिलदादा गावंडे, तेल्हारा नगरपरिषद चे प्रशासक तथा मुख्याधिकारी सतीशभाऊ गावंडे, ह.भ.प. गाडेकर महाराज आदींच्या उपस्थितीत हा उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी संस्कृतीचे पालन व रक्षण करण्याचे आवाहन ह.भ.प. सोपान महाराज यांनी आपल्या कीर्तनातून भाविकांना केले तसेच त्यांनी 11 तरुणांकडून हजारो भाविकांच्या समक्ष व्यसनमुक्त होण्याचे वचन घेतले.
तेल्हारा शहराच्या इतिहासात प्रथमच एका चौकाचा लोकार्पण सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्याला कुणबी समाजासह संपूर्ण मानव जातीतील विविध धर्म-पंथातील नागरिक , ज्येष्ठ नागरिक , बंधू व मोठ्या संख्येने महिला भगिनी सुद्धा आवर्जून उपस्थित होत्या. कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट संचालन दबळगाव गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन बंटीभाऊ राऊत यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button