अपघात

पिक अप मालवाहनाची दुचाकीला धडक

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव । एका मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना काल ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० ते ४ वाजता सुमारास खामगाव रोडवरील हिरो होंडा शोरूम समोर घडली. घटनेचे चित्रण शोरूमच्या कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड झाले असल्याने वाहनचालकाने दुचाकी चालकाला धडक दिल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

अपघातात गंभीर जखमी युवकांची आई सौ. विजयादशमी उत्तम इंगळे (६५) रा. पंचशीलनगर शेगाव यांनी शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० ते ४ वाजता सुमारास त्यांची दोघे मुले नामे संदीप व अमित हे शेगावकडे येत असताना नांदुरा

येथील मालवाहु पिकअप वाहन क्र. एमएच २७ बीएक्स ६७२३ च्या चालक अतुल मारोती मरे (२४) रा. वडी ता. नांदुरा याने फिर्यादीच्या मुलांच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे अपघात घडून अपघातात फिर्यादीची दोघेही मुले अपघातात डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाली आहेत. जखमींना सर्वप्रथम माऊली हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अकोला येथील ओझोन हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले आहे.

तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम २८१, १२५ ए, १२५ बी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास नापोका निलेश गाडगे हे करित आहेत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button