तेल्हारा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न! स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अकोला जिल्हा प्रतिनिधी.

तेल्हारा दि. १० ऑगष्ट | स्थानिक तेल्हारा शहरातील साई गणेश कॉम्प्लेक्स येथे अकोला जिल्ह्याचे महासचिव विकास पवार राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.गट) यांचे जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. या कार्यालयाचे उद्घाटन आमदार मा. अमोल मिटकरी (वि. प.) यांचेकडून करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अकोला जिल्हाध्यक्ष मो.बद्रुजमा तसेच प्रमुख अतिथी म्हणून मदन भरगड प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य , संध्याताई वाघोळे प्रदेश संघटक सचिव , छायाताई कात्रे प्रदेश संघटक सचिव , प्रतिभाताई अवचार महिला जिल्हाध्यक्ष , ज्ञानेश्वर मानकर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख , उमेर अदनान (जिल्हाध्यक्ष विद्यार्थी ), महेश खारोडे तालुका कार्याध्यक्ष , काशीरामजी साबळे प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य , उज्वलाताई राऊत प्रदेश सचिव , राधाताई बिरकड प्रदेश सचिव , डॉक्टर विशाल इंगोले वैद्यकीय जिल्हाध्यक्ष , संदीप कुलट जिल्हा संघटक , अमोल काळाने जिल्हाध्यक्ष युवक , सुरेश ओंकारे तालुका अध्यक्ष व नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा मध्ये प्रवेश घेतलेले अकोला जिल्ह्याचे महासचिव विकास पवार आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाला सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज , भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदि महामानवांच्या प्रतिमेला वंदन करून तसेच कार्यालयाच्या उद्घाटनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकोला जिल्हा महासचिव विकास पवार यांनी केले यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले . या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये पक्ष प्रवेश केला .यावेळी आ. मा.अमोल मिटकरी व उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या वतीने पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
आगामी काळात हे कार्यालय तेल्हाऱ्याचा चेहरा-मोहरा बदलून टाकेल तसेच कार्यालयामध्ये प्रत्येक आठवड्याला जनता दरबार भरवण्यात येणार व त्या माध्यमातून अनेकांच्या समस्या सोडवल्या जाणार असल्याचे आमदार मा. अमोल मिटकरी यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणातून आश्वासन दिले. यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रतीक पखान यांनी केले.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी



