तेल्हारा शहरात , छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी , दख्खनी मराठा समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा दि.२० ; हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची सोमवार दि.१९ फेब्रुवारी २०२४ ला ३९४ वी जयंती होती.महाराजांच्या जयंती दिनानिमीत्त दख्खनी मराठा समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन हि जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छ.शिवाजी महाराजांचा जन्म इ.स.१६३० मध्ये झाला असुन येत्या ६ वर्षानंतर म्हणजेच २०३० या वर्षामध्ये महाराजांच्या जन्मदिनाला ४०० वर्ष पुर्ण होणार आहेत. महाराजांचा जन्मोत्सव महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर देश- विदेशात ३९३ वर्षानंतर ही आनंदाने साजरा होताना आपल्याला दिसून येतो. या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दख्खनी मराठा समाजाच्या वतीने तेल्हारा शहरातील माहेश्वरी भवन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये रांगोळी स्पर्धा , वेशभूषा स्पर्धा , वकृत्व स्पर्धा ई. स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. दुपारी ठिक ०४:३० वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती स्थापित पालखीची शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली . या शोभायात्रेमध्ये प्रथमदर्शरनी भागात चालत असलेल्या शहरातील लेझीम पथकाच्या उत्कृष्ट सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते हि बाब अतिशय उल्लेखनीय होती. याबरोबरच शहरातील अग्रसेन महाराज टावर चौक येथे लाठी-काठी , लेझीम , पोव्हाळा , छत्रपती शिवाजी महाराजांचे पाळणा गीत आदिंचे प्रदर्शन करण्यात आले होते, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन व हारार्पण करुन समाजाच्या वतीने महाराजांची सामुदायिक महाआरती करण्यात आली. येथुन माहेश्वरी भवन कडे पालखीचे प्रस्थाण झाले. माहेश्वरी भवन येथील कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या वंदनाने करण्यात आली असुन आयोजित विविध स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विजय स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट संचालन अनंतराव सोनमाळे यांनी केले ,तर आभार प्रदर्शन कु. साक्षी कदम यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांच्या जयंती दिनी दख्खनी मराठा समाजातील चंद्रकांत भाऊ मोरे यांच्यासह असंख्य बंधू-भगिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या समारोपा नंतर उपस्थितांकरिता उत्कृष्ट जेवणाची मेजवानीही आयोजकांतर्फे करण्यात आली होती .



