जळगावा जिल्हाबुलढाणा

आज बुलढाणा शहरातील नगरपरिषद येथे पद ग्रहण कार्यक्रम संपन्न.

आज बुलढाणा शहरातील नगरपरिषद येथे पद ग्रहण कार्यक्रम संपन्न…जीडी रोकडे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा…बुलढाणा शहराच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक आणि परिवर्तनाचा संदेश देणारा ठरला. नगर परिषद येथे पार पडलेल्या पदग्रहण सोहळ्यात शिवसेना पक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. पूजाताई संजयजी गायकवाड यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला.या प्रसंगी युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख मा. श्री. ऋषिभाऊ जाधव यांनी सौ. पूजाताईंना सत्कार करून बुलढाणा शहराच्या विकासासाठी शिवसेनेची भूमिका अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. जनतेच्या विश्वासावर मिळालेला हा विजय सामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा ठरेल, असेही त्यांनी सांगितले.तसेच बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार मा. श्री. संजयजी गायकवाड साहेब यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वामुळेच शिवसेना आज बुलढाण्यात जनतेचा विश्वास संपादन करत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.याच कार्यक्रमात शिवसेना पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा देखील शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. आगामी काळात शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि विकासकामांवर भर दिला जाईल, असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.या वेळीशिवसेना जिल्हाप्रमुख श्री. ओमसिंग राजपूत,नगरसेवक श्री. कुणाल गायकवाड, श्री. विजय जायभाये,शिवसेना–युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा म्हणजे बुलढाणा शहराच्या विकासासाठी एक नवी सुरुवात असल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button