बुलढाणा

मूकनायक सन्मान सोहळा व संघटनेचा प्रथम वर्धापन दिन 31 जानेवारीला शेगावात.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगावः पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी गेल्या वर्षापासून सतत कार्यरत असलेली नॅशनल व्हाईस मीडिया फोरम पत्रकार संघटनेचा प्रथम वर्धापन दिन व राज्यस्तरीय मूकनायक सन्मान सोहळा कार्यक्रम 31 जानेवारी 2026 रोजी संत नगरी शेगावात घेण्याचा निर्णय स्थानिक शासकीय विश्रामगृह शेगाव येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत एक मताने घेण्यात आला पुढील कार्यक्रमाची रूपरेषा व प्रसिद्धी पत्रक लवकरच काढण्यात येणार असल्याचे वरिष्ठांनी सांगितले नॅशनल व्हॉईस मीडिया फोरम या पत्रकार संघटनेची बैठक दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाली सदर मिटींगचे आयोजन राज्य प्रभारी देवचंद्र समदुर यांनी केले होते सदर बैठकीला संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम वानखडे हे अध्यक्ष स्थानी होते. तसेच मुख्य मार्गदर्शक संघटनेचे राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार, प्रमुख उपस्थितीत किरण उपाध्याय, राज्य संघटक पदमा मोहड हे होते. बैठकीची सुरवात क्रांतिज्योती सावित्री फुले यांची जयंती साजरी करून केली.

त्यावेळी उपस्थित राज्य संघटक पदमा मोहड यांनी देशातील पहिली महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करण्यात होते. या आले. बैठीला महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित बैठकीत मूक नायक पत्रकार दिन व संघटनेचा प्रथम वर्धापन दिन हा 31 जानेवारी 2026 ला शेगाव मध्ये साजरा करणे संदर्भात चर्चा करण्यात आली व शेगाव मध्येच कार्यक्रम घेण्याचे एकमताने निर्णय घेण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी व पत्रकारांनी आपले विचार मांडले सदर मूकनायक सन्मान सोहळा कार्यक्रमात पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच यावेळी संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त संघटनेच्या प्रथम स्मरण पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे संघटनेत काम करू इच्छिणाऱ्या पत्रकारांनी संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले तसेच प्रत्येक जिल्ह्याने

आपल्या परीने या कार्यक्रमात जास्तीत जास्त पत्रकार सहभागी करावे असे आवाहन केंद्रीय व राज्य कार्यकारिणी केले या बैठकीला उपस्थित पत्रकारांमध्ये रवि शेगोकार, जसवंत बहादुरे, कैलास खराटे, जफर खान, नागेश भटकर, अनिल खराटे, डॉ. कपिल मुन, गौतम इंगळे, संजय इंगळे, जुगल सावळे, भीमकिरण दामोदर, विजय टेंभुर्णे, पंकज मुनेश्वर, अमीन शेख, अनिल सावदेकर यांच्या सह मोठ्या प्रमाणावर पत्रकार बैठकीला उपस्थित होते. बैठकीस शेगाव शहर व तालुका कार्यकारणी यांनी परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शन रवी शेगोकार

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button