खानदेशबुलढाणा

प्रश्नाचे उत्तर न आल्याने इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची अमानुषपणे मारहाण ; जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार; पिंपळगाव राजा येथील घटना शिक्षकावर गुन्हा दाखल. जखमी विद्यार्थ्यावर उपचार सुरू .

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – प्रशांत चव्हाण

खामगांव : प्रश्नाचे उत्तर न आल्याच्या कारणावरून चौथीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने अमानुषपणे मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार पिंपळगाव राजा येथील जि.प.शाळेत उघडकीस आला , याप्रकरणी पीडित विद्यार्थ्यांच्या पालकाच्या फिर्यादीवरून पिंपळगाव राजा पोलिसांनी संबंधित शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पीडित बालक पवन नारायण इंगळे (वय १०) हा जि. प. शाळा पिंपळगाव राजा येथे इयत्ता ४ थी मध्ये शिक्षण घेत आहे. याप्रकरणी शाळेतील शिक्षक रवींद्र चिम यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रवींद्र चिम हे पवन इंगळे या विद्यार्थ्याला मागील अनेक दिवसापासून वारंवार मारहाण करीत होते. काही महिन्यापूर्वीही शिक्षकाने पवनला बेदम मारहाण केली होती. त्यावेळी पवन च्या कानातून रक्तस्राव झाला होता, मात्र, त्या घटनेनंतर काही स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करून पालकांनी शिक्षकाकडून माफी मागून घेतली होती. भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत . अशी ग्वाहीही शिक्षकाने दिली होती. तरी देखील त्यानंतर विद्यार्थ्यावर अत्याचार सुरूच राहल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शनिवारी शाळेतून घरी परतल्यानंतर पवन इंगळे याला अचानक चक्कर येऊन तो जमिनीवर कोसळला .आणि भयभीत झालेल्या आई-वडिलांनी विचारपूस केली असता. पवनने शाळेत शिक्षकाकडून झालेल्या मारहाणीची संपूर्ण हकीकत सांगितली. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या पालकांनी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन गाठून. आरोपी शिक्षक रवींद्र चिम ( रा. जळका भडंग ) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पालकांची लेखी फिर्याद व वैद्यकीय अहवालाच्या आधारे पिंपळगाव राजा पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या जखमी विद्यार्थ्यावर उपचार सुरू असून . पुढील तपास पोलीस करत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्न उभे केले जात आहे .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button