Uncategorized

निसर्ग स्पर्श फाउंडेशन टीम मंगरूळपीर शाखा कोल्हार च्या सदस्यांनी दिले अजगराला जीवदान

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मंगरूळपीर : – ता.30 सप्टेंबर रोजी कोलार येथील परेश गावंडे हे शेतामध्ये त्यांची बैल जोडी घेऊन जात असताना त्यांना सकाळी 10 वाजता भला मोठा साप दिसून आला त्यानंतर त्यांनी ताबड़तोड़ निसर्गस्पर्ष फाउंडेशन मंगरूळपिर टीम चे सदस्य तथा वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीमचे अध्यक्ष श्रीकांत डापसे यांना कॉल केला आणी सापाबद्दलल माहिती दिली माहिती प्राप्त होताच तातडीने सर्पमित्र श्रीकांत डापसे, सर्पमित्र अतूल डापसे,विष्णु गावंडे. यांनी घटानस्थळ गाठल तेथे त्यांना अजगर बिनवीषारी ( indian rock python )आढळुन आला लगेच सर्पमित्रांनी त्या 5 फूट अंदाजे 15 किलो आगाराला यशस्वी रित्यापकडले नंतर RFO जन्मय जाधव साहेब यांच्या मार्गद्शनाखाली व तसेच निसर्ग स्पर्श फाउंडेशन मंगरूळपीर चे संस्थापक अध्यक्ष गौरव कुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विषारी 5 फुट अजगराला जंगलामध्ये सोडून देण्यात आले आहे.शेतकर्यांनी मानले सर्पमीञाचे आभार

दैनंदिन जीवन जगत असतांना आपल्या घरात परिसरात अंगनात किंवा शेतात कुठेही साप दिसल्यास घाबरुन जावु नका किंवा सापाला मारु नका साप हा डायरेक्टर चावा घेत नाही त्यालाही जिवन आहे त्यामुळे याबाबतीत घाबरण्याचे कुठलेही कारण नसुन साप दिसल्यास तातडिने आम्हाला संपर्क करा आम्ही आपल्या सेवेशी 24 तास तत्पर आहो विषारी सापाचे 4 प्रकार आहेत त्यापैकी, घोणस,मन्यार,नाग,फुरसे, आहेत.परंतु सापाबद्दल पुरेशी माहिती नसल्याने काहीजन बिनवीषारी सापाला विनाकारण मारतात असे न करता आम्हाला संपर्क करावा असे आवाहन सर्पमीञ श्रीकांत डापसे यांनी केले आहे.

श्रीकांत डापसे
सर्पमिञ(कोलार) जि.वाशिम

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button