महाराष्ट्रविदर्भशेती

चालेना इ पीक पाहणी ॲप, शेतकऱ्यांच्या डोक्याला नुस्त मनस्ताप

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – ई-पीक पाहणी नोंद्णी प्रक्रिया ही शेतकऱ्यांना संकट काळात नुकसान भरपाईसाठी जलद लाभ व्हावा या हेतूने हा प्रकल्प राज्यात राबवण्यात येते.शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी महा-ई-सेवा किंवा इतर केंद्रामध्ये जाऊन आपली पिक पाहणी करावी लागत होती.परंतु आता घरबसल्या शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलच्या साह्याने अगदी काही क्षणामध्ये पीक पाहणी करू शकत होते.तेही अगदी मोफत.ई-पीक पहाणी घरबसल्या करता यावी यासाठी सरकारने ई पीक पाहणी ॲप लॉन्च केले.या ॲपच्या माध्यमातून अगदी काही क्षणातच घरबसल्या आपणास आपल्या पिकाची पाहणी करता येते.माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा असा नारा देत ह्या ॲपची निर्मिती करण्यात आली.शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात जाऊन स्वतःच पिक पेरा नोंदवावा हा त्याच्या मागचा मूळ उद्देश होता.यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला.शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पेरणीस सुरुवात केली.आता पेरणी होऊन जवळपास दोन महिने उलटले तरीही सदर ॲप सुरूच झाले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांची पिक पाहणी किंवा पीक नोंदणी अद्यापही बाकी आहे.1 ऑगस्ट नंतर हे ॲप सुरू होण्याचे होणार असल्याच शासनाकडून जरी कळविण्यात आले.ज्यांनी उडीद,मूंग या अल्प मुदतीच्या पिकाची लागवड केली.त्यांचे पीक परिपक्व किंवा काढणीच्या अवस्थेत आले.जर पिकाची काढणी केली मग नोंदणी कधी करायची असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे.काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे मुंग,उडीद पिकाच नुकसान झाले.जर पिकाची नोंदणी झाली नसेल तर विमा कंपनी सदर मूंग,उडीद पिकाचा नुकसान देण्यास का बर तयार होईल हा पण एक प्रश्नच आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे दोहेरी नुकसान होईल.

प्रतिक्रिया

मुंग,उडदाचे पीक सततच्या पावसामुळे खराब झाले.त्यात अद्यापही त्याची नोंद नाही.विमा मिळणार की नाही यात शंकाच तरी हे ॲप दरवर्षी जून महिन्यात सुरु करावे जेणेकरून अशा समस्यांना शेतकऱ्यांना भविष्यात सामोरे जावे लागणार नाही – अजिंक्य मेडशीकर (शेतकरी )
शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी काढलेल्या विविध योजनेची व्यवस्थितपणे अंमलबजावणी होणे खूप गरजेचे आहे, परंतु असे असताना
शेतकऱ्यांना त्रास होत असेल तर
ही बाब चिंतेची आहे
सामाजिक कार्य कर्ते ( मेडशी )

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button