ग्रामीण रुग्णालय येथे जागतिक मधुमेह दिन साजरा

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथे 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यात आला. ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुहास वाहूळे , डॉ गजानन शिंदे,डॉक्टर कपिल सुर्वे सर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रुग्णालयामध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांची मधुमेह ,उच्च रक्तदाब तपासणी अधिपरिचारिका पूजा कांबळे सिस्टर यांनी केली व समुपदेशक प्रवीण गोरे यांनी आलेल्या सर्व नागरिकांना मधुमेह म्हणजे काय त्याची लक्षणे काय त्या मध्ये वारंवार लघवीला जाणे, अचानक वजनात घट, वारंवार तहान लागणे, अशक्तपणा किंवा चक्कर येणे ही लक्षणे उद्भवतात त्यावर उपाययोजना कशा करायच्या त्यामध्ये संतुलित आहार घ्यावा ,वजन संतुलित ठेवावे ,नियमित व्यायाम करावा, ठराविक कालावधीने शरीरातील तपासणी करून घ्याव्या, जीवनशैली धकाधकीची तणावाची ठेवू नये, औषधोपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा मध्येच बंद करू नये, घरात आई- वडील किंवा भाऊ यांना जर मधुमेह असेल तर त्यांच्या पुढच्या पिढीत हा आजार होण्याची शक्यता दाट असते त्यामुळे त्यांनी मधुमेहाची तपासणी करणे गरजेचे आहे इत्यादी विषयी मार्गदर्शन केले त्यावेळी ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथील औषध निर्माता सुनील तोंडे , क्षय किरण तंत्रज्ञ सराफ मॅडम, करवते, माधुरी सिस्टर, सुनिल नवघरे, अक्रम बेग,विवेक दिकोंडवार व राणी रुग्णालय मालेगाव येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



