वाशिम मेरा युवा भारत केंद्राच्या वतीने क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम ; मेरा युवा भारत केंद्र वाशिम युवा कार्यक्रम येऊन खेळ मंत्रालय भारत सरकार अंतर्गत आदिवासी मुलीचे शासकीय वस्तीगृह येथे 15 नोव्हेंबर आद्य आदिवासी क्रांतीचे जनक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन नेहरू युवा बहुउद्देश्यमंडळ केकतउमरा व आदिवासी मुलीचे वस्तीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
जयंतीच्या निमित्ताने निबंध स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले होते यामध्ये प्रथम,द्वितीय,तृतीय,प्रोत्साहन पर क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र माय भारत(MY Bharat) नाम फलक डायरी वितरण करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला माजी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक तथा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त प्रदीप पट्टेबहादुर, आदिवासी मुलीचे वस्तीगृह गृहपालिका देशमुख मॅडम, मेरा युवा भारत केंद्र स्वयंसेवक दत्ता मोहोळ, राजा प्रसेनजीत संस्था प्रतिनिधी वैष्णवी पानझाडे, रा.स.यो स्वयंसेविका आकांक्षा गायकवाड यांची उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करणे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती.
यावेळी प्रदीप पट्टेबहादुर यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की क्रांतिकारी आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांनी त्यांनी इंग्रजांच्या आदिवासी जमिनीचा शोषण आणि अत्याचाराच्या विरुद्ध बंड पुकारला ज्याला उलगुलान असे म्हणतात. बिरसा मुंडा यांच्या पराक्रम आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी बिरसा मुंडा जयंती साजरी केली जाते. हा दिवस झारखंड आणि इतर राज्यांमध्ये सर्वांगीक सुट्टी म्हणून देखील साजरा केला जातो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष देशमुख मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेमधील प्रथम क्र.ममता तिवाले, द्वितीय क्र.दिपाली तिवाले, तृतीय क्र. स्वाती वाघमारे,यांनी पटकाविला तर निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्र. सुषमा जटाळे,द्वितीय क्र.स्वाती वाघमारे,तृतीय क्र.पूनम तिवारी यांनी पटकाविला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक यांनी केले. विद्यार्थ्यांनी यांची पदयात्रा ही नालंदा नगर परिसरा करण्यात आली या पदयात्रेतून (माटी के वीर) भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्यावर घोषणा देण्यात आल्या. सदर कार्यक्रमाचे आयोजन हे मेरा युवा भारत केंद्र वाशिम जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत व लेखा अधिकारी अनिल ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली तीवाले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी मुलीचे शासकीय वसतिगृह गृहपालीका देशमुख मॅडम यांनी केले.उपस्थित सर्वांचे आभार कु. निकिता वाघमारे यांनी मानले.



