Uncategorized

रिसोड मालेगाव विधानसभा मतदान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना अवैधरीत्या पैसे वाटप करणाऱ्यावर होणार कारवाई

मालेगाव प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – रिसोड मालेगाव मतदार संघातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या मतदारसंघांमध्ये निवडणूक कालखंडामध्ये मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी पैसे किंवा इतर आर्थिक बाबी देऊन उमेदवार निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांना आर्थिक प्रलोभन देऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्यास तसेच कोणत्याही ठिकाणी पैशांची अवैध हालचाली होत असल्यास आपण 9172713974 या नंबर वर संपर्क साधावा .असे अहवान
वाशिम जिल्ह्याचे आयपीएस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्याकडून करण्यात येते. तसेच मतदान हा आपल्या लोकशाहीचा कणा आहे. मतदान करणे हे आपले संविधानिक हक्क आहे. आपल्या मतदानाने लोकशाही बळकट होते. कुणाच्याही आर्थिक लाभाच्या आमिषेला बळी न पडता . मतदात्याने आपले मतदानाचे हक्क स्व:इच्छेने पार पाडून रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांना आर्थिक प्रलोभान देऊन त्यांचे मन वाढवण्याचा प्रयत्न करणारी लोक व तसेच या परिसरात कुठल्याही ठिकाणी पैशाची अवैध हालचाली होत असल्यास नागरिकांनी 9172713974 या नंबर वरती संपर्क साधण्याचे आव्हान केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button