जखमी केलेल्या भारतीय नाग जातीच्या सापाचे सर्पमित्रांनी वाचविले प्राण

६ दिवसाच्या उपचारातून सापाला मिळाले जीवनदान
“सर्प मित्र विष्णू पायघन, प्रदिप पट्टेबाहदुर यांच्या प्रयत्नास यश”
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम : वाशिम येथून 20 कि.
मी,अंतरावर असलेल्या ग्राम कोकलगाव येथे स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या परिसरामध्ये एक साप असल्याचे नागरिकांना आढळून आले. यावेळी संबंधित माहितीही सर्पमित्र विष्णू पायघन, प्रदिप पट्टेबहादूर यांना दिली असता यावेळी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली असता. २५ डिसेंबर २०२४ ला दुपारी २:३६ वाजताच्या सुमारास पकडले भारतीय नाग जातीचा विषारी साप असल्याची माहिती यावेळी सर्पमित्रांनी दिली.
यावेळी या सापाला व्यवस्थित रित्या त्याब्यात घेतली असता या सापाला मोठा जखमी असल्याचे आढळून आले. या भारतीय नाग जातीच्या सापाच्या शेपटीपासून पोटाकडे एक फुटाच्या अंतरावर मोठी जखम फ्रॅक्चर असल्याचे यावेळी सर्पमित्र प्रदिप पट्टेबहादुर, विष्णू पायघन यांनी वाशिम येथील व्हेटर्नरी डॉक्टर तथा सर्पमित्र गणेश फूलउंबळकर यांच्याकडे घेऊन गेले असता यावर ४ टाचे देऊन उपचार करून या सापाला. सर्पमित्र गोपाल बोरचाटे यांच्याकडे ६ दिवसांसाठी उपचाराकरिता ठेवण्यात आले.१ जानेवारी २०२५ ला दुपारी १२:२८ मिनिटाला या सापाची प्रकृती लक्षात घेता तो पूर्णपणे बरा झाला. या सापाला सर्पमित्र गोपाल बोरचाटे, गणेश फुलंबळकर प्रदीप पट्टेबहादुर विष्णू पायघन यांनी जखमी सापाचा जीव वाचवून नवीन जीवनदान देण्याचा आनंद अंगीकारत मोठ्या आनंदाने या सापाला आदी वनातमध्ये सोडले.
(बॉक्स)
सापाचा जीव वाचवण्यासाठी सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधा –

यावेळी सर्पमित्रांनी नागरिकांना आव्हान केले.की सापाला जीव न मारता आपण सापाचा जीव वाचवावा साप हा निसर्गातील महत्त्वाचा घटक आहे. आपल्या भागामध्ये जर कुठल्या साप आढळला तर आपण वनविभाग अथवा सर्पमित्र याच्याशी संपर्क साधावा असे आव्हान यावेळी सर्पमित्र यांनी केले.



